शहरं
Join us  
Trending Stories
1
धनगर आरक्षणाचा जीआर निघाला तर ६५ आमदार राजीनामा देणार; महायुतीच्या आमदाराचा इशारा
2
४४ वर्षांनंतर काँग्रेसने जम्मू-काश्मीरच्या तरुणाला दिली जबाबदारी,उदय भानू चिब कोण आहेत?
3
आधी आक्रमक इशारा, नंतर हात जोडले; शरद पवारांच्या पक्षात गेलेल्या नेत्याबद्दल अजित पवार काय म्हणाले?
4
...तर अशांवर POCSO गुन्हा दाखल होणार; चाइल्ड पोर्नोग्राफीवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
5
उद्धव ठाकरे नाही, नाना पटोले मुख्यमंत्री होणार? दाव्यावर काँग्रेस नेत्यांच्या प्रतिक्रिया यायला लागल्या
6
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि CM एकनाथ शिंदेंची भेट; 'वर्षा' बंगल्यावर अर्धा तास खलबतं
7
काँग्रेस नेत्या कुमारी शैलजा भाजपात जाणार? खट्टर यांच्या ऑफरवर दिलं स्पष्ट उत्तर...   
8
टायमिंगच्या नादात बसनं वेग पकडला; भीषण अपघातात ६ जण जागीच ठार
9
धमकी देणारा 'तो' आमदार कोण?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटावर संजय शिरसाट यांचा दावा
10
हमासचा नवा प्रमुख सिनवारही मारला गेला? इस्रायलने चौकशीला सुरुवात केली
11
Coldplay ची भारतात प्रचंड चर्चा! लाखो रुपयांची तिकिटं क्षणार्धात संपली; काय आहे या बँडचा इतिहास?
12
Dnyaneshwari Jayanti: माऊलींचा विश्वाला अमृत ठेवा; जगत् कल्याणाचे पसायदान देणारी ज्ञानेश्वरी
13
राज्याच्या राजकारणात काय शिजतंय?; विधानसभेपूर्वीच महायुतीत ठिणगी पडण्याची शक्यता
14
Tarot Card: सोमवार थोडा कंटाळवाणा, सप्ताह ठरणार आनंदाचा; वाचा टॅरो भविष्य!
15
Gold Rate Today : सप्टेंबरच्या अखेरच्या आठवड्यात सोन्याच्या दरात तेजी; पाहा २२ कॅरेट, २४ कॅरेट सोन्याची किंमत
16
WTC Points Table मध्ये आता लंकेचाही 'डंका'; न्यूझीलंडला दिला मोठा दणका!
17
ऐहिक वासना नष्ट होऊन सर्व सुखाची प्राप्ती करून देणारा ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी; एका वाचकाचा प्रासादिक अनुभव!
18
पितृपक्षात गुरुपुष्य योग: १० राशींना लॉटरी, अचानक धनलाभ; लक्ष्मी-कुबेर कृपा, मालामाल व्हाल!
19
मुख्यमंत्रिपदासाठी नाना पटोलेंचं नाव पुढे करणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांना संजय राऊतांचा टोला, म्हणाले...
20
शरद पवार गटाच्या मतदारसंघावर दावा; विधानसभा निवडणुकीत वसंत मोरेंची होणार कोंडी?

सारथीकडे प्रशासनाची पाठ

By admin | Published: July 06, 2017 3:12 AM

ई-गव्हर्नन्स क्षेत्रात पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने मागील काळात नेत्रदीपक कामगिरी केली आहे. २०१३-१४ वर्षांमध्ये पालिकेने मिळवलेले

लोकमत न्यूज नेटवर्करावेत : ई-गव्हर्नन्स क्षेत्रात पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने मागील काळात नेत्रदीपक कामगिरी केली आहे. २०१३-१४ वर्षांमध्ये पालिकेने मिळवलेले देश-विदेशातील पुरस्कार हे त्याची साक्ष देतात. बेस्ट सिटी, स्मार्ट सिटी या आणि इतर अनेक पुरस्कारांत सारथी या सेवेचा मोठा वाटा आहे. सध्या पिंपरी-चिंचवड महापालिकेने कार्यान्वित केलेली तसेच सामान्य नागरिकांमध्ये लोकप्रिय असलेली सारथी योजना कोलमडली आहे.भारत सरकारने गौरवलेली आणि राज्यातील सर्व पालिकांनी दखल घेतलेली सारथी योजना अधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्या दुर्लक्षामुळे पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. तसेच आयुक्तांनी या नागरिक प्रिय योजनेकडे पाठ फिरवल्यामुळे सारथी अखेरच्या घटका मोजत आहे. या सारथी योजनेमध्ये राज्याच्या ‘आपले सरकार’ च्या योजनेप्रमाणे नवीन संशोधन आणि बदल आवश्यक आहेत. नवीन स्वरूपातील सारथी योजनेचे नागरिक वाट पाहत आहेत. सारथीमध्ये नोंदविण्यात आलेल्या तक्रारी ह्या विभागप्रमुख, अभियंता, महापौर आणि आयुक्त यांच्या डेस्क स्क्रीन वर आॅनलाइन रजिस्टर होणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे संबंधित विभागाने नवीन पोर्टलची निर्मिती करणे गरजेची वाटते. त्याचप्रमाणे दररोज नोंदल्या जाणाऱ्या तक्रारींचे निराकरण होत नाही. त्यामुळे शहरातील अनेक कामे रखडलेली आहेत. दर शनिवारी होणारी संगणक तंत्रज्ञांची बैठकही अनेक महिने झालेली नाही. त्यामुळे महापालिका आणि नागरिकांचे सुद्धा नुकसान होत आहे. देशामध्ये पिंपरी-चिंचवड नगरी ही सारथी योजनेची जननी आहे. तिचे जतन, संवर्धन होणे गरजेचे आहे. सारथी हेल्पलाईन अधिक सक्षम करणे आवश्यक आहे. सध्या सारथीचा वापर केवळ माहिती मिळवणे व तक्रार नोंदवणे एवढाच होत आहे़ यामध्ये बदल केला पाहिजे त्यात सेवा मिळवणे आणि सहयोग अर्थात सूचना/प्रतिक्रिया मिळविणे याचा समावेश करावा. महाराष्ट्र सरकारने ज्या प्रकारे आपले सरकार पोर्टल विकसित केले त्याला अनुसरून ‘सारथी’मध्ये आवश्यक बदल केले पाहिजे व त्यामध्ये पारदर्शकता आली पाहिजे, असे प्राधिकरण नागरी सुरक्षा समितीचे अध्यक्ष विजय पाटील म्हणाले.बैठका नाहीत : अधिकाऱ्यांना पडला विसरपूर्वी तत्कालीन आयुक्त श्रीकर परदेशी यांनी स्वत: जातीने लक्ष घालून सारथी योजना यशस्वी केली होती. त्या काळात सर्वच अधिकारी काटेकोरपणे नागरिकांच्या प्रत्येक तक्रारीचे निवारण करीत होते. दर मंगळवारी आयुक्त स्वत: सर्व विभाग प्रमुखांबरोबर बैठक घेत असत. त्यामुळे त्याकाळी अल्पावधीतच सारथी योजना लोकप्रिय ठरली. दुर्दैवाने श्रीकर परदेशी यांच्या बदलीनंतर राजीव जाधव आणि दिनेश वाघमारे यांच्या दुर्लक्षामुळे सारथी योजना मरणासन्न अवस्थेत येऊन पोहचली आहे, अशी नागरिकांची तक्रार आहे. गेले काही महिने दर आठवड्याला होणारी, दर मंगळवारी होणारी बैठक एकदाही संपन्न झाली नाही. त्याचप्रमाणे नागरिकांच्या शेकडो तक्रारीचे अद्याप निराकरण झालेले नाही. माननीय आयुक्तांनी सारथीकडे पाठ फिरवल्यामुळे एकही वरिष्ठ अधिकारी बैठकीस उपस्थित रहात नाही.