पुणे : कोरोनाबाधितांची कमी झालेली संख्या व अन्य सरकारी रूग्णालयावरील कमी झालेला रूग्णसेवेचा ताण लक्षात घेता, कोरोना आपत्तीत सहा महिन्यांसाठी उभारलेली जम्बो कोविड रूग्णालये बंद करण्याच्या हालचाली प्रशासनाने सुरू केल्या आहेत़ येत्या १५ जानेवारीपर्यंत शिवाजीनगर व पिंपरी येथील जम्बो रूग्णालये तात्पुरत्या स्वरूपात बंद होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
या निर्णयामुळे शिवाजीनगर येथील जम्बो रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांना नायडू, बाणेर आणि ससून रुग्णालयात दाखल करण्यात यावे व पिंपरी येथील जम्बो रुग्णालयातील रुग्णांना यशवंतराव चव्हाण रुग्णालयात दाखल करण्यात यावे, असा निर्णय होऊ शकतो. दरम्यान कोरोनाच्या संसर्गाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता व सध्या कोरोना विषाणूचा नवे स्वरूप याचा संसर्ग पाहता, या दोन्ही जम्बो रुग्णालयांतील पायाभूत सुविधा या तशाच ठेवाव्यात व केवळ येथील व्यवस्थापन आणि उपचार बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे़
-------------------------------