शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
4
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
5
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
6
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
8
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
9
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
10
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
11
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
12
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
13
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
14
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
15
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
16
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
17
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
18
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
20
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी

पारदर्शी मतदानासाठी प्रशासन सज्ज! पुण्यातील ४ मतदारसंघासाठी ८२ लाख मतदार हक्क बजावणार, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

By श्रीकिशन काळे | Published: March 17, 2024 3:51 PM

ज्या ठिकाणी अतिसंवेदनशील केंद्रे आहेत, तिथे मुबलक बंदोबस्त असेल आणि केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे लावले जातील

पुणे : पुणे जिल्ह्यात पुणे, बारामती, मावळ आणि शिरूर हे चार लोकसभा मतदारसंघ आहेत. राज्यात एकमेव हा जिल्हा आहे, जिथे चार लोकसभा मतदारसंघ असून, एकूण मतदारांची संख्या ८२ लाख २४ हजार ४२३ आहे. त्यासाठी ८ हजार ३८२ मतदान केंद्रे असतील. तर ४४ ईव्हीएम मशीन लागणार आहेत, तसेच निवडणूकीसाठी आवश्यक मनुष्यबळ देखील सज्ज करण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी पत्रकार परिषदेत दिली. पारदर्शी मतदानासाठी आम्ही कडक बंदोबस्त देखील करू, असेही आश्वासन त्यांनी दिले.

या वेळी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चोबे, ग्रामीण पोलीस अधिक्षक पंकज देशमुख, अतिरिक्त आयुक्त कविता द्विवेदी, पीएमआरडीएचे अतिरिक्त आयुक्त दीपक सिंगला, अतिरिक्त जिल्हाधिकारी अजय मोरे उपस्थित होते.

डॉ. दिवसे म्हणाले, शहरात आचारसंहिता लागू केली आहे. सर्व ठिकाणचे फलक काढण्याचे आदेश व संबंधितांना सूचना दिलेल्या आहेत. तीन दिवसांमध्ये ते काढले नाही तर आम्ही कारवाई करू. फलक काढण्याचा खर्च संबंधितांकडून वसूल करू आणि त्यांच्यावर गुन्हे देखील दाखल करू. ही निवडणूक संपूर्णपणे पारदर्शक होण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून आमचे प्रशासन काटेकोरपणे सर्व नियोजन करत आहे. पोलीसांनी देखील तयारी केली आहे.’’

दिव्यांग, ज्येष्ठांसाठी खास सोय

जे मतदार दिव्यांग आहेत आणि ८५ वयापेक्षा अधिक आहेत, त्यांच्यासाठी आम्ही घरपोच मतदान घेण्याची सोय करणार आहोत. तसेच यांच्यासाठी प्रत्यक्ष केंद्रावर जाऊन मतदान करायचे असेल तर त्यांच्यासाठी व्हीलचेअरची सोय केलेली आहे. तसेच ‘सक्षम ॲप’ देखील उपलब्ध करून दिले आहे.

अतिसंवेदनशील केंद्रे

पुणे जिल्ह्यात एकूण ३९ अतिसंवेदनशील मतदान केंद्रे आहेत. त्यातील भोरला ३२, खेड-आळंदी ५ आणि आंबेगाव येथे २ आहेत.

सीसीटीव्हीची नजर

ज्या ठिकाणी अतिसंवेदनशील केंद्रे आहेत, तिथे मुबलक बंदोबस्त असेल आणि केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे लावले जातील. इंटरनेट सुविधा चांगली मिळण्यासाठी टॉवर उभारण्यात येतील. जेणेकरून तिथले मतदान टक्केवारी मिळेल.

स्ट्रॉग रूम व मतमोजणी कुठे?

पुणे, बारामती : एफसीआय गोदाम, कोरेगाव पार्कमावळ : बालेवाडी स्टेडियमशिरूर : स्टेट वेअरहाऊस, रांजणगाव, शिरूर

कोणत्या मतदारसंघात किती ईव्हीएम

पुणे : २६२३बारामती : ३२७१मावळ : १७४१शिरूर : ३२६२एकूण : १०,८९७

पुणे जिल्ह्यावर दृष्टीक्षेप

एकूण मतदार : ८२ लाखमतदान केंद्रे : ८३८२निवडणूक कर्मचारी : ७८ हजारईव्हीएम मशीन : ४४ हजारएकूण वाहने : ३६७५

पुणे जिल्ह्यातील मतदार 

पुरूष मतदार : ४२ लाखमहिला मतदार : ३९ लाखपहिल्यांदा नवमतदार : ३५ हजार २३२दिव्यांग मतदार : ८५ हजारसरकारी कर्मचारी : ५७७७

टॅग्स :Puneपुणेlok sabhaलोकसभाElectionनिवडणूकcollectorजिल्हाधिकारीcctvसीसीटीव्हीPoliceपोलिसVotingमतदान