पुणे : गेल्या वर्षी कोरेगाव भीमा येथे झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनातर्फे मोठी दक्षता घेतली जात असून येत्या १ जानेवारी रोजी विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी येणाऱ्या जनसमुदायाची गैरसोय होऊ नये म्हणून प्रशासकीय यंत्रणा सुसज्ज करण्यात आली आहे. तसेच स्थानिक, लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यात समन्वयाने काम सुरू आहे. या काळात कायदा-सुव्यवस्थेच्या आड येणाºयांची कोणतीही गय केली जाणार नाही, असे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले.कोरेगाव भीमा दंगलीची पार्श्वभूमी लक्षात घेऊन जिल्हाधिकारी राम यांनी दोन महिन्यांत या परिसरातील नागरिकांच्या चार ते पाच बैठका घेतल्या. तसेच कोरेगाव भीमा, वढू, सणसवाडी, पेरणे फाटा, शिक्रापूर या ठिकाणांची पाहणी करून स्थानिकांशी चर्चा केली आहे. नागरिकांच्या तक्रारी, समस्या जाणून घेतल्या आहेत. कोरेगाव भीमा परिसरात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्याशी चर्चा करून पोलिसांचा फौजफाटा वाढविण्यास सांगितले, तसेच पुण्याबाहेरून येणाºयांच्या वाहनांसाठी विशेष वाहनतळ उपलब्ध करून दिला जाईल. अन्नाची परवड होऊ नये म्हणून स्थानिक हॉटेलचालकांना सूचना दिल्या आहेत.येत्या १ जानेवारी रोजी विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी विविध ठिकाणांहून नागरिक येतील. त्यानिमित्ताने पुणे शहर व परिसरात फलक लावले जातात; परंतु फलक लावण्यापूर्वी तसेच स्वतंत्र कार्यक्रम किंवा रॅली काढायाची असल्यास जिल्हा प्रशासनाकडून परवानगी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले.
कोरेगाव भीमासाठी प्रशासन सज्ज; विजयस्तंभ मानवंदनेसाठी तयारी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2018 4:10 AM