आमदार कुल म्हणाले की,
सद्यस्थिती मध्ये दौंड शहर व तालुक्यातील ग्रामीण भागात ४०० हुन अधिक कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहेत. तालुक्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येमध्ये होणारी हि वाढ अत्यंत चिंतेची बाब आहे. वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक उपायोजना तसेच तयारीचा आढावा घेण्यासाठी तालुक्यातील विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची आज शासकीय विश्रामगृह यवत येथे बैठक घेतली.
सार्वजनिक रुग्णालयांमध्ये कोविड टेस्ट किट, PPE किट, मास्क ची योग्य प्रमाणात उपलब्धता सुनिश्चित करावी , आवश्यकतेनुसार टेस्ट ची संख्या वाढवावी. शासकीय रुग्णालय, डेडिकेटेड कोविड सेंटर, खाजगी रुग्णालये येथे ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर आदी ची उपलब्धता सुनिश्चित करावी आदी निर्देश कुल यांनी प्रशासनाला दिले.
या बैठकीस तहसीलदार संजय पाटील , गट विकास अधिकारी अजिंक्य येळे, डॉ. संग्राम डांगे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेखा पोळ डॉ. शशिकांत इरवाडकर , पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील , दौंड पोलीस निरीक्षक नारायण पवार उपस्थित होते.
फोटो ओळी
यवत येथील बैठकीमध्ये बोलताना आमदार राहुल कुल व मान्यवर.