याबद्दल येथील ज्येष्ठ नगरसेवक, सामाजिक, राजकीय कार्यकर्ते यांनी प्रशासन व कार्यकर्ते यांच्याबाबत प्रतिक्रिया दिल्या आहेत. पूर्वी प्रशासनाने, हॉस्पिटलने एखादा चुकीचा निर्णय किंवा काम केले, तर त्याविरुद्ध कॅन्टोन्मेंट भागातील नागरिक, सामाजिक, राजकीय कार्यकर्ते आंदोलन, मोर्चा, आदी मार्गाने प्रशासन व लोकप्रतिनिधींना जाब विचारत. ज्यामुळे लोकशाही जिवंत असल्याचे जाणवायचे, परंतु ही परंपरा आज गेल्या ५ वर्षांत पाहायला मिळत नाही.
चौकट
शेरीयार इराणी यांचं आंदोलन असो किंवा भाजपचे रुग्णालय प्रशासनाबद्दल केलेल्या आंदोलनामार्फत हॉस्पिटलवर पडलेली सीबीआयची धाड, डॉ. आंबेडकर सांस्कृतिक भावनासाठी बौद्ध धम्म सेवा संघ यांचे आंदोलन, किंवा कृष्ण दिवेकर यांनी वॉर्ड राखीव होण्यासाठी केलेली न्यायालयीन लढाई अशी अनेक जनआंदोलन येथे झाली आहेत.
लोकमतने पटेल रुग्णालयाला दोन वेळेस लागलेल्या आगीपासून ते आजच्या शिवाजी, फॅशन मार्केट आगीपर्यंत, रुग्णालयातील अनागोंदी कारभार आणि इतर संदर्भात वेळोवेळी मांडला. याबद्दल काही मोजकेच कार्यकर्ते प्रशासनाला जाब विचारल्याचे दिसून आले. येथील ज्येष्ठ नगरसेवक, कार्यकर्ते, नागरिक काहीसे नाराज पाहायला मिळतात.
विनोद संघवी ज्येष्ठ मा. नगरसेवक- आज कार्यकर्ते अॅक्टिव्ह दिसत नाही. माझ्या कार्यकाळात आम्ही विरोधातला विषयही समोरच्याला विश्वासात घेऊन सोडवायचो.
बाप्पू गाणला ज्येष्ठ नगरसेवक- पूर्वी मुख्य कार्यकारी अधिकारी स्वतः रस्त्यावर येऊन फिरायचे. नागरिकांशी संवाद साधून अडचणी सोडवायचे. आज ते दिसत नाही.
रोहिदास गायकवाड (मा. नगरसेवक आरपीआय)- आजचे कार्यकर्ते विषय अभ्यासूपणे हाताळताना दिसत नाहीत. मूळ विषयापासून दुरावल्याने ही समस्या येते.
देवेंद्र भाटिया (ज्येष्ठ कार्यकर्ते भाजप)- प्रशासन कार्यक्षम हवं. आपली जबाबदारी विसरता कामा नये. त्यामुळे ही वेळ येणार नाही.
विजय जाधव (मा. अध्यक्ष काँग्रेस)- पूर्वी आमची सत्ता असूनही आम्ही प्रशासन चुकले तर जाब विचारत, परंतु, आजच्या कार्यकर्त्यांत हे दिसत नाही.
अतुल गोंदकर (ज्येष्ठ शिवसैनिक)- आम्ही आजही सक्रिय आहोत. निष्क्रिय प्रशासनाविरुद्ध वेळोवेळी आंदोलन, निवेदन देत असतो. आताच्या परिस्थितीत प्रशासन कोरोनाचे कारण देत जबाबदारी झटकत आहे.
विकास भांबुरे(कर्तव्य प्रतिष्ठान)- गैरकारभाराबाबत कुठलिही माहिती प्रशासन तोंडी वा लेखी देत नाही, कोरोनाचे कारण पुढं करतात.
येथील ज्येष्ठ नगरसेवक, कार्यकर्ते, नागरिक काहीसे नाराज पाहायला मिळतात.