शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
2
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
3
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
4
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
5
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
6
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
7
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
8
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
9
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
10
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
11
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
12
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
13
जिद्दीला सलाम! आई-बाबांचा मृत्यू; दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही करतो डिलिव्हरी बॉयचं काम
14
माहिममध्ये मोठा खेळ झाला? भाजपच्या नेत्याचा निवडणुकीनंतर ठाकरे गटात प्रवेश 
15
दहा अंकी मोबाईल नंबर तरुणाला करणार करोडपती? साउथच्या सिनेमाने घातलाय 'गोंधळ'; वाचा नेमकं प्रकरण
16
कॅनडातील विमानतळांवर भारतीयांची अतिरिक्त तपासणी होणार नाही; या घोषणेनंतर ट्रुडो सरकारने निर्णय बदलला
17
Adani प्रकरणी SEBI ची पहिली प्रतिक्रिया; अमेरिकेच्या आरोपांवर केलं 'हे' वक्तव्य
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'नवरीचा पत्ता नाही आणि यांनी लग्नाची तयारी केली'; नारायण राणेंचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल
19
'भाजप सरकार आल्यावर वीज अन् पाण्याची बिले भरावी लागतील', अरविंद केजरीवालांचे टीकास्त्र
20
IND vs AUS : 'जानी दुश्मन' ठरला एकदम 'सस्ता'; हर्षित राणाची पहिली विकेट एकदम झक्कास (VIDEO)

कौतुकास्पद! पिंपरी चिंचवड महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांच्या प्रकल्पाला आंतरराष्ट्रीय पुरस्कार

By प्रकाश गायकर | Published: June 28, 2024 3:45 PM

या स्पर्धेमध्ये विजेती ठरणारी महापालिकेची इंद्रायणीनगर शाळा भारतातील एकमेव सरकारी शाळा ठरली आहे....

पिंपरी : महापालिकेच्या इंद्रायणीनगर प्राथमिक शाळेतील सातवीच्या विद्यार्थ्यांनी बनविलेल्या ड्रेनेज अलर्ट सिस्टीम या प्रकल्पाला ‘कुलेस्ट प्रोजेक्ट’ या आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये ‘कोडींग विथ कमिटमेंट’ या प्रकारात विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. या स्पर्धेमध्ये विजेती ठरणारी महापालिकेची इंद्रायणीनगर शाळा भारतातील एकमेव सरकारी शाळा ठरली आहे.

इंद्रायणीनगर महापालिका शाळेतील नैतिक इहारे, श्रावस्ती गायकवाड, निकिता वाघचौरे आणि निकीता थिटे या विद्यार्थ्यांनी गटारे तुंबून सार्वजनिक आरोग्य धोक्यात येत असल्याचे बघितले. या समस्येवरील उपाय म्हणून त्यांनी ‘वॉटर फ्लो सेन्सॉर’ आणि ‘पायथन कंप्यूटर लॅंग्वेजचा’ उपयोग करुन प्रकल्प तयार केला. या प्रकल्पाद्वारे गटार तुंबल्याबरोबर अलार्म वाजतो. तसेच त्या संबंधातील संदेश थेट महापालिकेच्या कार्यालयात तक्रार म्हणून नोंदविला जातो. विद्यार्थ्यांच्या या महत्वाकांक्षी प्रकल्पाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मानांकन मिळाले आहे. शाळा स्तरावर या प्रकल्पासाठी मुख्याध्यापक वंदना ईनांन्नी, वर्गशिक्षक सुरेश धायकर, अविनाश बोडखे आणि पाय फाउंडेशनच्या प्रशिक्षिका स्नेहा वाहुले व मोनाली कुबडे यांनी विशेष परिश्रम घेतले. 

४३ देशांमधून साडेचार हजार प्रकल्प-

कुलेस्ट प्रोजेक्ट ही स्पर्धा लंडन स्थित रास्पबेरी पाय जॅम फाउंडेशन या आंतरराष्ट्रीय संस्थेद्वारे आयोजित केली जाते. या स्पर्धेमध्ये एकूण ४ हजार ५०० पेक्षा अधिक प्रकल्प जगातील विविध ४३ देशांमधून नोंदविण्यात आले होते. त्यामध्ये इंद्राणीनगर शाळेतील विद्यार्थ्यांनी समाजाला भेडसावणाऱ्या स्वच्छता व सार्वजनिक आरोग्य या समस्येवर यशस्वीरित्या तोडगा काढला. तसेच शाश्वत विकासाच्या लक्षांवर चांगले कार्य केले म्हणून ‘कोडिंग विथ कमिटमेंट’ या विशेष पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. 

महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना मिळालेला हा सन्मान त्यांच्या सर्जनशील क्षमतेचे उत्तम उदाहरण आहे. कुलेस्ट प्रोजेक्ट स्पर्धेमध्ये इंद्रायणीनगरची शाळा ही भारतातून एकमेव सरकारी शाळा विजेती ठरली, ही उल्लेखनीय बाब असून विद्यार्थ्यांनी तयार केलेला हा अभिनव प्रकल्प सार्वजनिक आरोग्याच्या गंभीर समस्येचे जलद पद्धतीने निराकरण करण्यासाठी भविष्यात उपयुक्त ठरणार आहे. त्यांची ही कामगिरी खरोखरच कौतुकास्पद आहे.- प्रदीप जांभळे, अतिरिक्त आयुक्त,

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडSchoolशाळाMuncipal Corporationनगर पालिका