पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रातील ३१६ कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावी प्रवेशासाठी ऑनलाईन प्रवेशप्रक्रिया राबविली जात आहे. आतापर्यंत प्रवेशाच्या दोन फेऱ्या पूर्ण झाल्या असून, त्यातून ३८ हजार ९७५ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे. आता तिसऱ्या फेरीतून ९ हजार २६१ विद्यार्थ्यांना महाविद्यालये अॅलॉट केली आहेत. त्यात कला शाखेच्या १ हजार ३७, वाणिज्य शाखेच्या ३ हजार ८६५, विज्ञान शाखेच्या ४ हजार २१६ आणि एचएसव्हीसीच्या १४३ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
प्रवेशाच्या तिसऱ्या फेरीसाठी २९ हजार ५०५ विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांचे पसंतीक्रम नोंदविले होते. मात्र, त्यातील केवळ ९ हजार २५१ विद्यार्थ्यांना महाविद्यालये देण्यात आली असल्याने २० हजाराहून अधिक विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी पुढील फेरीची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
------------------------
तिसऱ्या फेरीतून पसंतीक्रमानुसार प्रवेश मिळालेले विद्यार्थी
पसंतीक्रम प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या
१ २,३१४
२ २,१४३
३ १,३४०
४ १,०२३
५ ७३१
६ ५२४
७ ४१७
८ ३१६
९ २१५
१० २०२