बारामती : बारामती एमआयडीसीतील नर्सिंग वसतिगृहातील तात्पुरत्या कोविड हॉस्पिटलमधील रुग्णांना दाखल करून घेताना एका डॉक्टरने पैशांची मागणी केली असल्याची तक्रार करण्यात आली आहे. त्यामुळे त्याची दखल घेत जिल्हा शल्यचिकित्सकांनी त्यांच्यावर कारवाई केल्याची चर्चा सुरू आहे. संबंधित डॉक्टरांची या प्रकारानंतर उचलबांगडी करण्यात आली आहे. तात्पुरत्या कोविड हॉस्पिटलमधील या डॉक्टरांची वरिष्ठांनी तडकाफडकी बदली केली आहे.
रुग्णांना दाखल करून घेताना काही चुकीचे प्रकार संबंधित डॉक्टरांनी केल्याने त्यांची उचलबांगडी करण्यात आली. संबंधित डॉक्टरांच्या प्रतापांचे व्हिडीओ चित्रीकरणच बारामतीतील एका वजनदार राजकीय पदाधिकाऱ्यास रुग्णांच्या नातेवाअकांनी पाठविले. त्यानंतर हा प्रकार उघड झाला. या प्रकाराची स्वत: जिल्हा शल्यचिकित्सकांनी यात चौकशी केली. तसेच तातडीने संबंधित डॉक्टरची नर्सिंग वसतिगृहातील ड्यूटी बदलून त्यांना महिला रुग्णालयात पाठवून दिले आहे.
———————————————