शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले...
2
"ही भाषा...", अजित पवार यांच्या 'वाली' वक्कतव्यावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; PM मोदी, अमित शाह यांचंही नाव घेतलं!
3
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
4
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
5
Meta चा Video, लोकेशनसह अलर्ट; पोलिसांनी १२ मिनिटांत ९ किमी जाऊन वाचवला तरुणाचा जीव
6
Sunita Williams : सुनीता विल्यम्सच्या अडचणी वाढल्या, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात तडे, अनेक ठिकाणाहून गळती
7
जेफरीजनं 'या' ५ Stock वर सुरू केलं कव्हरेज, दिला खरेदीचा सल्ला; HAL, PNB सारख्या दिग्गजांचा समावेश
8
खळबळजनक! सलमान खानवर गोळीबार केल्यानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगने केलेला 'हा' प्लॅन
9
Astrology: शनिदोष टाळण्यासाठी सगळ्याच राशीच्या लोकांनी आवर्जून 'अशी' घ्या काळजी!
10
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
11
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
12
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
13
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
14
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
15
Vastu Tips: लक्ष्मीविष्णुंना प्रिय असलेले कमळ घरात लावल्याने होणारे आर्थिक लाभ जाणून चकित व्हाल!
16
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
17
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
18
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
19
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
20
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र

अ‍ॅडव्हान्स टेक्नॉलॉजी करणार वणव्यांचा सामना

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2019 7:21 PM

वणवे किंवा आगी लागायचे प्रामुख्याने दोन प्रकार आहेत. एक म्हणजे नैसर्गिक व दुसरे मानवनिर्मित असते.

ठळक मुद्देउन्हाळ्यामुळे आगीच्या घटना वाढणार वन विभागाकडून उपाययोजना
पुणे : उन्हाळा सुरू झाल्याने टेकडी, वन विभागाच्या परिसरात आगी लागण्याच्या घटना सुरू झाल्या आहेत. काही दिवसांपूर्वी तळजाई टेकडीवर आणि सोमवारी म्हातोबा टेकडीवर आग लागली. त्यात टेकडीचे नुकसान तर झालेच पण जैवविविधतेसाठी आवश्यक घटक कीटक, किडे, छोटे प्राणी, पक्ष्यांचे घरटे यांचाही त्यामध्ये बळी गेला. दरम्यान असे वणवे विझविण्यासाठी वन विभागातर्फे विविध यंत्रांचा उपयोग करण्यात येत आहे. वणव्यांचा सामना करण्यासाठी संपूर्णपणे वन विभाग सज्ज झाले आहे. त्यासाठी अ‍ॅडव्हान्स टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात येत आहे. वणवे किंवा आगी लागायचे प्रामुख्याने दोन प्रकार आहेत. एक म्हणजे नैसर्गिक व दुसरे मानवनिर्मित असते. नैसर्गिक वणव्यांचे अथवा आगी लागण्याचे प्रमाण केवळ १२ ते १५ टक्के एवढेच आहे, तर मानवनिर्मित बाबींचे सर्वसाधारण प्रमाण ८० ते ८५ टक्के असते. नैसर्गिक आगी ही झाडे किंवा बांबू यांच्या घर्षणाने लागू शकतात अथवा वीज पडून, शॉर्टसर्किट होऊन आदी गोष्टींमुळे आग लागू शकतात. परंतु मानव निर्मित आग किंवा वणवे हे अनेक वेळा समाजकंटक, विकृत लोकांकडून लावले जातात. यामध्ये सिगरेट, बीडी, काडेपेटीचे थोटके जंगलात, डोंगरात फेकून दिले जातात. त्यामुळे आग लागते. वणवे हे अनेक वेळा गैरसमजुती मधून लावले जातात. वणवे, आगीच्या भक्ष्यस्थानी पडून दरवर्षी अनेक हेक्टर जागेतील देशी झाडे, औषधी झाडे, अनेक जातीचे पशु, पक्षी, सरपटणारे प्राणी, कीटक, फुलपाखरे, बेडूक, साप यांचा मोठा अधिवास असतो. तो आगीच्या भक्ष्यस्थानी पडून खाक होतो. साधारणत जानेवारी ते मे अखेरपर्यंत आगीचे प्रमाण किंवा वनव्याचे सत्र मोठे असते, अशी माहिती टेल्स ऑर्गनायझेशनचे लोकेश बापट यांनी लोकमत ला दिली. शहरात आणि जिल्ह्यात ज्या ठिकाणी वणवे लागण्याची शक्यता आहे, अशी ठिकाणे आम्ही शोधली आहेत. त्या ठिकाणी मार्च, एप्रिल, मे या तीन महिन्यांसाठी एक मजूर नेमण्यात आला आहे. तो वणव्यावर लक्ष ठेवेल. जिथे आग लागली असेल, त्याची माहिती तो वन विभागाला देईल. तसेच वणवे ज्या ठिकाणी लागतात, त्या ठिकाणी जाळपट्टी टाकली आहे. शक्य त्या ठिकाणी पाण्याच्या टाक्या ठेवल्या आहेत. जेणेकरून त्वरित आगीवर पाणी टाकून विझवता येईल. अनेक नागरिक दुपारी टेकडीवर फिरायला येतात. त्यातील बरेचजण बिअर पितात, पत्ते खेळतात, सिगारेट ओढतात. त्यातून आग लागल्याच्या घटना घडतात. त्यावरही आमचे लक्ष आहे, असे सहाय्यक वनसंरक्षक महेश भावसार यांनी सांगितले. आग विझविण्यासाठी अ‍ॅडव्हान्स टेक्नॉलॉजी फायर ब्लोअर हे अ‍ॅडव्हान्स यंत्रही आम्ही वापरत आहोत. ते मजूराकडे दिले असून, हे यंत्र पाठीवर ठेवून आग विझवता येते. त्यातून हवेचा मोठा झोत बाहेर येतो आणि आग विझते. छोटे छोटे फायर बिटरही उपलब्ध करून दिले आहेत. पूर्वी झाडाच्या फांद्या किंवा माती टाकून आग विझविली जात असे. परंतु, नागरिकांना त्यासाठी आगीच्या जवळ जावे लागे आणि त्यात अनेकदा ते भाजले जात असत. त्यामुळे आम्ही आता हाताने वापरता येतील, असे यंत्र उपलब्ध केली आहेत. ग्राक कटर हे यंत्र, कर्मचाºयांना फायर प्रुफ ड्रेस देत आहोत, असे सहाय्यक वनसंरक्षक महेश भावसार यांनी ह्यलोकमतह्णला सांगितले. वणवा लावल्याने पुढील वर्षी गवत चांगलं येते, जमीन सुपीक राहते, झाडे चांगली येतात. प्रथम हा गैरसमज दूर केला पाहिजे. निसर्गामधील वृक्ष, वेली, झाड, कीटक प्राणी हे निसर्गचक्र व्यवस्थित ठेवण्याचे काम माणसापेक्षा कितीतरी जास्त चांगलं करीत असतात. आपण मात्र उगीचच मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप करत राहतो. वनवे लावल्याने जमिनीची मोठ्या प्रमाणात धूप होते. पहिल्याच पावसात गवत जळून गेल्याने त्याच्या आजूबाजूची सर्व माती मोकळी होते व हीच माती डोंगरदºयात वाहून धरणामध्ये जाते. तिथे गाळ मोठ्या प्रमाणात साठत राहतो. - लोकेश बापट, टेल्स आॅर्गनायझेशन ..............वणवा लागला तर १९२६ वर कॉल करा राज्यात कुठेही वन क्षेत्राला वनवा लागला, कुठे अतिक्रमण होत असेल, वन्यजीव जखमी असेल किंवा वन विभागाशी संबंधित काही समस्या असेल तर त्वरित कारवाई होण्यासाठी वन विभागाने १९२६ हा २४ तास कॉल सेंटर नंबर सुरू केला. नागरिकांनी वणवा लागला किंवा वन विभागाच्या इतर समस्येबाबत यावर माहिती द्यावी, असे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले. ...........................म्हातोबा टेकडीवर सोमवारी खूप मोठा वणवा लागला. हा वणवा चांगलाच वाढला होता. त्याबाबत वनविभागाला कॉल केला होता. परंतु, त्यांचे कोणीही घटनास्थळी आले नाही. स्थानिक नागरिकांनीच इकडून-तिकडून पाणी आणले आणि आग विझविण्याचा प्रयत्न केला. - अ‍ॅड. विंदा, स्थानिक नागरिक .....................