शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

जाहिरात फलकांच्या खासगीकरणाचा घाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 3:56 AM

महापालिका, स्मार्ट सिटीकडून नवीन जाहिरात धोरणाचा प्रस्ताव

पुणे : महापालिका व स्मार्ट सिटीकडून शहरातील जाहिरात फलकांच्या खासगीकरणाचा घाट घातला जात आहे. यासाठी पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेट कॉर्पोरेशन यांना महापालिकेला नवीन जाहिरात धोरणाचा प्रस्ताव दिला आहे. त्यात परवानगी दिलेले १ हजार ८८६ जाहिरात फलक, शासकीय जागा, दिशादर्शक कमानी, सर्वाजनिक स्वच्छतागृह, पीएमपी बस, शेल्टर याचा समावेश आहे. या निविदेमधून मिळणाऱ्या उत्पन्नतील ७५ टक्के रक्कम महापालिकेतला, तर २५ टक्के रक्कम पीएमपीला देणार आहे. स्मार्ट सिटी कंपनीला निविदा रकमेच्या दोन टक्के रक्कम दिली जाणार आहे.शहरातील जाहिरात धोरण राबविण्याबाबतचा प्रस्ताव पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी रार्जंद्र जगताप यांनी दिला आहे. पालिकेच्या परवाना व आकाशचिन्ह विभागाकडून शहर हद्दीमध्ये एकूण १,८८६ जाहिरात फलकांना परवानगी दिलेली आहे. त्यापोटी प्रतिचौरस फूट २२२ रुपये प्रमाणे जाहिरात फलक, नामफलक व ताब्यात असलेले दिशादर्शकीमुळे अंदाजे ३० कोटी रुपये इतके वार्षिक उत्पन्न मिळते. पुणे महानगर परिवहन महामंडळाकडील अंदाजे १ हजार १५० बस शेल्टर १, २० जाहिरात फलक, सर्व बसवरील जाहिरातीपोटी व इतर सर्व जाहिरात निविदा प्रक्रियेतून वार्षिक १० कोटी उत्पन्न प्राप्त होते. त्यामुळे पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि. आता याबाबतची निविदा प्रकिया राबविणार आहे. त्यासाठी प्रतिचौरस फूट २२२ रुपये शुल्क घेणार आहे. सद्य:स्थितीत अस्तित्वात असलेले सर्व जाहिरात फलक, सर्व नवीन फलक, शासकीय-निमशासकीय संस्थाचा जागा, स्ट्रीट फर्निचर, पालिकेच्या जागेवरील व सार्वजनिक ठिकाणच्या सर्व जाहिराती, दिशादर्शक कमानी, सार्वजनिक स्वच्छतागृह, बांधकाम व्यावसायिक यांच्याकडून उभारले जाणारे जाहिरात फलक, नामफलक, सर्व फिरती वाहने यांचा समावेश असेल. नवीन जाहिरात फलकासाठी झोननिहाय परवानगी देणार आहे. स्ट्रीट फर्निचरअंर्तगत युनिपोल, गॅट्री, विघृत पोल, नवीन पूल, पादचारी पूल यांचा समावेश असेल.पालिकेच्या मालकीचे असलेले सर्व जाहिरात फलक, दिशादर्शक कमानी या कालावधी संपुष्टात आल्यानंतर स्मार्ट सिटी कंपनीकडे हस्तांतरित करण्यात येतील. पीएमपीकडील जाहिरातींचाही यामध्ये समावेश असेल. या निविदेचा कालावधी १५ वर्षांपर्यंत असेल. त्यापुढे कामाची गुणवता तपासून पुढील ५ वर्षांसाठी सर्वसाधारण सभेची मान्यता घेण्यात येईल. जाहिरात शुल्कामध्ये दर तीन वर्षांनी पाच टक्के वाढ केली जाणार आहे, असे आयुक्तांनी सादर केलेल्या प्रस्तावात म्हटले आहे.

टॅग्स :Smart Cityस्मार्ट सिटीPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका