शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
3
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
4
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
5
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
6
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
7
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
8
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
9
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
10
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
11
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
12
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
13
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
14
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
15
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

तब्बल १८ वर्षांनंतर झाली बापलेकीची भेट, सोशल मीडियामुळे सापडणे झाले शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 12:36 AM

फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅपसारख्या सोशल मीडियामुळे सामाजिक धोके निर्माण होत असले तरी त्याचा योग्य वापर केल्यास काही चांगलेदेखील घडून येऊ शकते, याची प्रचिती या घटनेमुळे आली.

रावणगाव : फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅपसारख्या सोशल मीडियामुळे सामाजिक धोके निर्माण होत असले तरी त्याचा योग्य वापर केल्यास काही चांगलेदेखील घडून येऊ शकते, याची प्रचिती या घटनेमुळे आली.तब्बल १८ वर्षांपूर्वी घरदार सोडून गेलेल्या गृहस्थास व्हॉट्सअ‍ॅपमुळे पुन्हा घरवापसी करणे शक्य झाले. यासाठी काही जागरूक तरुणांनी पुढाकार घेतला. बारामती तालुक्यातील सावळ गावातील संपत विठ्ठल आटोळे (वय ६०) हे गृहस्थ सन २००० साली आपल्याकडून झालेल्या थोड्याशा चुकीमुळे शेजारच्या शेतकऱ्याचा ऊस जळाल्याने त्यांच्यापासूनआपल्याला त्रास होईल, या भीतीने तसेच घरगुती वादविवादामुळे मानसिक संतुलन ढासळल्याने ते घराबाहेर पडले.घर सोडल्यानंतर मिळेल त्या ठिकाणी आणि मिळेल ते काम करत वेगवेगळ्या गावांमध्ये संपत आटोळे हे फिरत राहिले. त्याच दरम्यान जाधव आणि बिरादार यांनी (सावळ, ता. बारामती) येथील भारतीय जनता पार्टीचे बारामती तालुका अध्यक्ष प्रवीण आटोळे यांच्याशी संपर्क केला. तुमच्या गावातून संपत आटोळे नावाचा कोण माणूस घरातून निघून गेला आहे का, याची चौकशी त्यांना करावयास त्यांना सांगितले. दरम्यान प्रवीण आटोळे यांनी प्रथमदर्शनी चौकशी केल्यावर त्यांच्या काहीच लक्षात आले नाही. त्यामुळे त्यांनी व्हॉट्सअ‍ॅपवर त्या व्यक्तीचा फोटो पाठविण्यास सांगितले आणि मग जाधव आणि बिरादार यांनी संपत यांचा फोटो प्रवीण आटोळे यांच्या व्हॉट्सअ‍ॅपवर पाठविल्यानंतर तो फोटो गावातील काही वृद्ध लोकांना दाखविला असता हे तर आपल्याच गावातील संपत विठ्ठल आटोळे आहेत.लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यामधील जानापूर या गावात गेले. त्याच गावात (भिगवण, ता. इंदापूर) येथील जेसीबी व्यावसायिक मोहन जाधव हे आपल्या कामानिमित्त जानापूरात गेले असता तेथील मित्राला भेटावयास गेले होते. तेव्हा त्यांना मित्राच्या घराशेजारीच एक गृहस्थ अत्यंत केविलवाण्या अवस्थेत बसलेले दिसले. त्यांचा चेहरा आणि पोशाख पाहून जाधव यांना त्यांची दया आल्याने त्यांनी या गृहस्थाची विचारपूस केली असता ते फक्त संपत आटोळे एवढेच नाव सांगून गप्प बसले. त्यानंतर जाधव आणि त्यांचे जानापूरचे मित्र कल्याण बिरादार यांनी आटोळे आडनावाचे लोक कोठे कोठे राहतात. याचा शोध घेणे सुरू केले. त्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी मित्रांना संपर्क केला.त्यानंतर त्यांची पत्नी आणि इतर नातेवाईकांनी दोन-तीन वर्षे शोध घेण्याचा प्रयत्न केला; परंतु, ते न सापडल्याने घरातीलमंडळींनी त्यांची घरी पुन्हा माघारी येण्याची आशा सोडूनच दिली होती.मग शिवाजी आटोळे यांनी संपत आटोळे यांच्या (रावणगाव ता. दौंड) येथील जावयाचे मोठे बंधू अशोक गावडे यांच्याशी संपर्क साधला. अशोक गावडे आणि शिवाजी आटोळे हे जानपूर या गावी संपत यांना आणावयास गेले. त्यांनी आपला पुतण्या शिवाजी आटोळे यांना पाहताच संपत यांनी त्यांना मिठी मारली.आणि जोरजोरात रडू लागले. त्यानंतर संपत आटोळे रावणगाव येथील त्यांच्या मुलीकडे आणले असता आपल्या वडिलांना पाहताच मुलीचा आनंद गगनात मावेनासा झाला. कारण एका मुलीला आपले घरातून निघून गेलेले वडील तब्बल १८ वर्षांनी आपल्याला भेटताहेत यावर काही क्षण तिचा विश्वासच बसत नव्हता.