पुणे : महापालिकेतील प्राथमिक शिक्षण विभागातील काम करणाऱ्या बालवाडी शिक्षिका व सेविका यांना २०२० पासूनची १० टक्के वाढ प्राथमिक शिक्षण विभाग विभागाकडून देण्यात आली आहे. याबाबतचे परिपत्रक नुकतेच जारी करण्यात आले आहे.
पुणे महानगरपालिका कामगार यूनियन (मान्यताप्राप्त) मध्ये सभासद असलेल्या पुणे महापालिकेतील प्राथमिक शिक्षण विभागातील काम करणाऱ्या बालवाडी शिक्षिका व सेविका यांना २०२० पासूनची १० टक्के वाढ शिक्षण विभाग प्राथमिककडून देण्यात आलेली नव्हती. २०२० ऑगस्ट पासून पुणे महानगरपालिका कामगार युनियन (मान्यताप्राप्त) ने या बाबत वेळोवेळी पत्र व निवेदन देऊन प्रत्यक्ष भेटी करुन बैठक करुन पाठपुरावा केला. या प्रश्र्नाकरिता संघटनेने कोर्टात केस देखील दाखल केली होती. त्यानुसार २ नोव्हेंबर पासून पुणे महानगरपालिकेने २०२० पासुनची १० टक्के वाढ मिळण्याबाबतचे परिपत्रक शिक्षण विभागाने जारी केले आहे. चार वर्षांच्या प्रदीर्घ लढाई नंतर अखेर बालवाडी शिक्षिका व सेविका यांच्या लढाईला यश आले आहे.