शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
3
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
4
सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
5
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
6
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
7
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
8
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
9
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
10
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
11
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
12
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
13
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
14
Priyanka Gandhi : "महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
15
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
16
Sankashti Chaturthi 2024: संकष्टीने सुरु होणारा आठवडा बाराही राशींसाठी ठरणार लाभदायी!
17
'या' १८ जिल्ह्यांमध्ये आता हॉलमार्किंगशिवाय सोन्याचे दागिने विकले जाणार नाहीत
18
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज
19
पुढील वर्षी १० वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी, मार्ग आणि फीचर्स जाणून घ्या...
20
IPO च्या समुद्रात उतरणार अमन गुप्ता यांची 'boAt', काय आहे कंपनीचा प्लान?

अतिक्रमण कारवाईनंतरही परिस्थिती जैैसे थे! नगर परिषदेचा वाहतूक आराखडाही कागदावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 3:27 AM

पुणे-नाशिक मार्गावरील राजगुरुनगर शहरातील वाडा रोड, पाबळ रोड येथील वाहतूककोंडीतील अडथळे मोठा गाजावाजा करीत प्रशासनाने हटविली. मात्र, काही दिवस गेल्यानंतर पुन्हा येथील परिस्थिती ‘जैसे थे’ झाल्याचे चित्र आहे.

- राजेंद्र मांजरेराजगुरुनगर : पुणे-नाशिक मार्गावरील राजगुरुनगर शहरातील वाडा रोड, पाबळ रोड येथील वाहतूककोंडीतील अडथळे मोठा गाजावाजा करीत प्रशासनाने हटविली. मात्र, काही दिवस गेल्यानंतर पुन्हा येथील परिस्थिती ‘जैसे थे’ झाल्याचे चित्र आहे. वाडा रोड भाजीमंडईलगत, पाबळ रोड येथे पुन्हा अतिक्रमण झाल्यामुळे वाहतूककोंडीत अजूनच भर पडत असल्याचे चित्र दिसत आहे.राजगुरुनगर शहरामध्ये मागील महिन्यात पुणे-नाशिक महामार्गावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळील वाडा रोड, पाबळरोड येथील अनधिकृत बांधकाम,शेड टपºया, हातगाड्या यांच्यावर सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय आधिकारी आयुषप्रसाद यांच्या मार्गदर्शनाखालीनगर परिषद, राष्ट्रीय राज्यमार्ग, सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यामार्फत कारवाई करण्यातआली होती. त्यात हातगाड्यांसह, टपºया व अन्य साहित्य जप्तकरण्यात आले. या कारवानंतर व्यावसायिकांना नगर परिषद हद्दीमध्ये पुन्हा जागा देण्यात आली. त्यांचे पर्यायी जागा देऊन पुनवर्सन करून हातगाड्या लावण्यास परवानगी देण्यात आली होती. तसेच राजगुरुनगर परिषद हद्दीमध्ये नगर परिषदेने टेंडर काढून वाहतूक आराखडाबाबत नियोजन केले होते. मात्र या नियमांची पायमल्ली होत असल्याचे चित्र दिसत आहे.चालताही येत नाही : विक्रेत्यांनी दुकाने थाटलीशहरातील एकेरी वाहतूक, वाहनतळ, वाहनबंदी (नो पार्किंग), झेब्रा क्रॉसिंग याबाबत शहरात ठिकठिकाणी केलेले नियोजन कागदावरच राहिल्याचे चित्र आहे. अतिक्रमण कारवाईनुसार त्या ठिकाणी टपरीधारक, फळविक्रेत्यांनी पुन्हा अतिक्रमण करू नये; असे आढळल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असेही सांगण्यात आले होते. मात्र पाबळ रोड येथे खासगी वाहनांचा वाहनतळ बनला आहे. त्यामुळे पादचाºयांना नीट चालताही येत नाही. तसेच वाडा रोड भाजीमंडईलगत रस्त्यावर भाजीविक्रेते रस्त्यावरच बसत असल्याने अजूनच वाहतूककोंडी होत आहे. महात्मा गांधी विद्यालयासमोर फळविक्रेत्यांनी पुन्हा दुकाने थाटली आहेत. या रस्त्यावरून विद्यार्थी, नागरिक यांना येथून जाताना विनाकारण त्रास होतो.काही ठिकाणी अनधिकृत टपºया व भाजीविक्रेते, फळ विक्रेत्यांनी रस्ते व पदपथांवर ठाण मांडलेले आहे. त्याकडे नगरपालिका प्रशासनाचे अतिक्रमण अधिकारी कोणतीही कारवाई करत नाही. किंबहुना त्यांच्याच आशीर्वादाने अतिक्रमणधारकांची मुजोरी कारवाईअभावी दिवसेंदिवस वाढत आहे अशी परिस्थिती आहे.कायदेशीर कारवाई करण्याची संपूर्ण जबाबदारी नगर प्रशासनाचीच आहे. अतिक्रमणे पूर्वीप्रमाणेच होत असतील तर इतर ठिकाणच्या अतिक्रमणांना चाप बसण्याचे दूरच, एकच महिन्यात पुन्हा सर्वत्र अतिक्रमणे वाढू लागल्याने त्याचा विपरीत परिणाम पादचारी, वाहनधारक सर्वांनाच होऊ लागला असल्याचे चित्र दिसत आहे. याबाबत नगर परिषद मुख्य अधिकारी संर्पक साधला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.माझी आता नव्यानेच नगराध्यक्षपदी निवड झाली आहे. याबाबत माहिती घेऊन पुढील दोन दिवसांत बैठक घेऊन योग्य ती कारवाई करणार आहे. शहरातील वाहतुक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी व नागरिकांच्या हितासाठी शहरातील पुन्हा होत अतिक्रमणे काढण्यात येतील.-शिवाजी मांदळे, नगराध्यक्ष राजगुरुनगर नगर परिषदपुन्हा अतिक्रमण होत असल्यास त्यांच्यावर पुन्हा कारवाई करण्यात येईल. त्यासाठी नगरपरिषद मध्ये अतिक्रमण विरोधी पथकांची नेमणुक करण्यात आली आहे. त्यांनी पुन्हा झालेले अतिक्रम हटवावे. तसेच मी उद्या मुख्याधिकारी यांच्याशी बोलून माहिती घेतो.-आयुष प्रसाद, उपविभागीय अधिकारी खेड विभागअतिक्रमणे हटवली परंतु यामुळे होत असलेली वाहतूक कोंडीची समस्या अजुनही सुटलेली नाही. फक्त जे हातावर पोट भरत होते,त्या सगळ्यांचे नुकसान झाले. मात्र वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी योग्य ती कारवाई करावी. अतिक्रमण धारांचे पुनवर्सन करावे.- दीपक थिगळे (नागरिक )

टॅग्स :Puneपुणे