पुणे : इतर पक्षांसारखी गर्दी व्हायला हवी, संपूर्ण सभागृह भरावे यासाठी भारतीय जनता पार्टीची पुण्यातली मेहनत अखेर फळाला आली असून राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या कार्यक्रमाला माणसे जमवण्यात यश आल्याचे पाहायला मिळाले.रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी आयोजित 12व्या रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यान रविवारी पुण्यात आयोजित करण्यात आले होते.या प्रसंगी 'आर्य चाणक्य-जीवन और कार्य :आज के संदर्भ में' हा विषय शहा यांनी विशद केला.यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, म्हाळगी प्रबोधिनीचे अध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे, खासदार विनय सहस्त्रबुद्धे, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी शहर भाजपने कंबर कसली होती.विशेषतः नगरसेवक, युवा मोर्चाला टार्गेट्स देण्यात आली होती.याशिवाय प्रतिष्ठीत मान्यवरांना येणार असल्याची खात्री करून घेत आमंत्रण पत्रिका देण्यात आली होती.कार्यक्रमप्रसंगी गर्दी झाल्यावर सगळ्यांनीच हुश्श केले. महापालिका इमारतीच्या उदघाटन समारंभात छत गळायला लागल्याने शहर भाजपवर टीका करण्यात येत होती. तसा कुठलाही प्रकार आज होऊ नये म्हणून पदाधिकाऱ्यांनी विशेष जोर लावला होता.