निरवांगी : नीरा नदी दुथडी भरून वाहू लागल्याने इंदापूर तालुक्यातील नीरा नदीपात्रातील वाळूउपसा जून महिन्यापासून बंद झाला आहे. उद्धट, तावशी, कुरवली, चिखली, कळंब, निमसाखर रासकरमळा, निरवांगी, खोरोची बोराटवाडी, चाकाटी या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात बेकायदा वाळूउपसा होत असतो.इंदापूर तालुक्यातील पश्चिम भागातील शेतकºयांसाठी नीरा नदी ही वरदायिनी ठरली आहे. परंतु, या नदीपात्रात काही ठिकाणी मार्च ते जून महिन्यापर्यंत पाणी नसते, काही ठिकाणी अत्यंत कमी असते. यामुळे या ठिकाणी वाळूचा उपसा मोठ्या प्रमाणात सुरू असतो. परंतु, जून महिन्यापासूनच पाऊस चांगला होत असल्याने नदीस पाणी येऊ लागले व नदीच्या पात्रातील गेल्या काही महिन्यापासून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे.यामुळे या गावालगतचा वाळूचा उपसा बंद झाला आहे. इंदापूर तालुक्यातील पश्चिम भागातील नीरा नदीकिनारी असलेले रस्ते वाळू वाहतुकीमुळे काही ठिकाणी खचलेले आहेत. महसूल विभागाबरोबरच बांधकाम विभागांना ही बेकायदेशीर वाळू वाहतूक करण्यात येत असलेल्या वाहनांवरती कारवाईचे अधिकारदेणे गरजेचे आहे, असे येथील ग्रामस्थांनी सांगितले
अखेर पाण्यानेच केला वाळू उपशाला पायबंद, बेकायदा वाहनांवर हवी कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2017 4:28 AM