दौंड : दौंड नगर परिषदेच्या स्वीकृत नगरसेवकपदासाठी पुणे जिल्हा राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष सोहेल खान यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. परंतु त्यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरविण्यात आला. दुपारी बाद झालेला अर्ज अखेर सायंकाळी वैध ठरला. त्यानुसार सोहेल खान यांनी निवडणूक निर्णय अधिकारी श्रीपती मोरे यांना कागदपत्रांची वस्तुस्थिती दाखवून माझा अर्ज अवैध कसा ठरविला, याबाबत विचारणा केली. त्या वेळी श्रीपती मोरे यांनी कागदपत्रांची पाहणी केली असता सोहेल खान यांनी जोडलेल्या नामनिर्देशनपत्राबरोबर मदरसा इमदादुल उलुम युसुफिया या संस्थेच्या कार्यकारिणीत हाजी सोहेल खान, हाजी नासिरखान असे नाव आहे. अर्जदार यांनी नामनिर्देशनपत्रावर सुहेल खान नासिरखान असे नाव नमूद केले आहे. दरम्यान, सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था नोंदणी कार्यालय यांचे रजिस्टरमधील नाव व नामनिर्देशनपत्रात नमूद नाव दोन्ही नावांची व्यक्ती एकच असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे अर्जदार यांचे नामनिर्देशनपत्र वैध ठरत आहे. परंतु स्वीकृत सदस्यांची प्रक्रिया पूर्ण झाली असल्याने योग्य त्या न्यायालयात दाद मागावी, असे निवडणूक निर्णय अधिकारी श्रीपती मोरे यांनी सोहेल खान यांना लेखी पत्र सायंकाळी दिले आहे.
अर्ज दुपारी बाद, सायंकाळी वैध
By admin | Published: February 16, 2017 3:00 AM