पुणे : पुण्यात शुक्रवारी चक्क कुरीअर सेवेनं धारदार तलवारी पोहोचल्या आणि एकच खळबळ उडाली. पुण्यातील डीटीडीसी कंपनीच्या कुरीअर सेवेनं आज तीन तलवारी पार्सल म्हणून आणल्या आहेत. लुधियानाहून या तलवारी कुणीतरी पार्सल केल्याची प्राथमिक माहिती स्वारगेटपोलिसांनी दिलीये.
लुधियाना हून या घातक शस्त्रांचं पार्सल पुण्यातील dtdc पार्सल ऑफिसमध्ये आल्यानंतर तिथल्या कर्मचाऱ्यांना शंका आली. पार्सल हे पूर्णपणे पॅक केलं असल्यानं नेमकं काय वस्तू आहे हे कळत नव्हतं. मात्र कुरीअर कर्मचाऱ्यांना पार्सलबाबत शंका असल्यानं त्यांनी पोलीस कंट्रोल रूमला फोन केला. त्यानंतर स्वारगेट पोलीस dtdcच्या ऑफिसला पोहोचले. पार्सल उघडल्यानंतर धारदार तलवारी या पार्सलमध्ये असल्याचं पुढे आलं. या विषयी अधिकची माहिती स्वारगेट पोलिसांनी दिलीये.
''दोन दिवसांपूर्वी औरंगाबादमध्येही dtdc कुरीअरने तब्बल 26 धारदार तलवारी पार्सल आल्या होत्या. त्याही लुधियाना इथूनच आल्या असल्याची माहिती पोलिसांनी दिली होती. कुरीअर सेवेनं इतक्या सहज धारदार शस्त्र पाठवता किंवा मागवता येतात हीच मुळात आश्चर्यची बाब आहे. औरंगाबादमध्ये सापडलेल्या तलवारी आणि पुण्यात सापडलेल्या तलवारी यांचं काही कनेक्शन आहे का याबाबत स्वारगेट पोलीस अधिक तपास करत आहेत असे स्वारगेट पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर यांनी सांगितले.''