पुणे : माहिती अधिकार कार्यकर्ते सतीश शेट्टी हत्या प्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) आणखी एका पोलीस अधिकाऱ्याला गजाआड केले आहे. पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या एलसीबीचा तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक नामदेव सुखदेव कवठाळे याला रविवारी रात्री उशिरा अटक करण्यात आली असून, आंधळकरपाठोपाठ झालेली ही दुसरी अटक आहे. कवठाळे याला सीबीआय न्यायालयाने १६ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सतीश भोजा शेट्टी हे तळेगाव दाभाडे येथील माहिती अधिकार कार्यकर्ते आणि भ्रष्टाचारविरोधी दक्षता समितीचे जिल्हा संघटक म्हणून काम करीत होते. तळेगाव दाभाडे येथील पंचवटी कॉलनीमधून प्रभात फेरी मारण्यासाठी जात असताना त्यांच्यावर १३ जानेवारी २०१० रोजी सकाळी हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास तळेगाव पोलिसांकडून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे (एलसीबी) गेला होता. त्या वेळी आंधळकर एलसीबीचा वरिष्ठ निरीक्षक होता, तर कवठाळे हा सहायक निरीक्षक होता. शेट्टी यांचे भाऊ संदीप शेट्टी यांनी हा तपास सीबीआयकडे वर्ग करावा, यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली होती. चार वर्षांपासून सीबीआयचे अधिकारी या प्रकणात बारकाईने लक्ष घालून तपास करीत होते. (पान ९ वर)
आंधळकरनंतर दुसरा अधिकारी गजाआड
By admin | Published: April 12, 2016 4:37 AM