शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआत उद्धव ठाकरेंवर दबाव?; ठाकरे गटाच्या नेत्याचा काँग्रेसला गर्भित इशारा
2
जितेंद्र आव्हाडांकडून खळबळजनक ऑडिओ क्लिप पोस्ट; अक्षय शिंदेची हत्या झाल्याचा दावा
3
₹100000 पार जाणार सोन्याचा भाव...? दिसतोय US Fed च्या निर्णयाचा परिणाम! या वर्षात झाली 30% वाढ
4
आता IPL मधून माघार घेणाऱ्या खेळाडूला मोजावी लागणार मोठी किंमत; जाणून घ्या नवा नियम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना पितृपक्षाची शुभ सांगता, ऑक्टोबर आणेल अच्छे दिन; अपार यश-लाभ!
6
IND vs BAN T20 : ऋतुराज गायकवाडला पुन्हा डच्चू! चाहत्यांचा रोष; चांगली कामगिरी असूनही वगळलं
7
भाजपाने अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा आमदार फोडला; विधानसभा निवडणुकीपूर्वीच मोठा झटका दिला
8
"CSK च्या चाहत्यांसाठी दुःखाची बाब आहे पण...", गंभीरची जागा घेताच ड्वेन ब्राव्हो भावुक
9
पितृपक्ष: एकाच दिवशी प्रदोष शिवरात्री शुभ संयोग; कसे करावे व्रत? पाहा, महात्म्य अन् मान्यता
10
टेक ऑफला वैमानिकाचा नकार; उद्योगमंत्री सामंत गेले मोटारीने, मालकाला फोन लावला तरी...
11
अमेरिकेनं दिलेल्या 5000 पाउंड वजनाच्या 'स्पेशल गिफ्ट'नं मरला गेला नसरल्लाह! इराणचा मोठा दावा
12
Video: पगार ६० लाख पण जगणं कठीण; कॅनडात भारतीयांना पैसे पुरेना, कारण काय?
13
कोल्हापूर : दोन्ही आघाड्यांच्या संभाव्य उमेदवारांचे चित्र स्पष्ट; सहा मतदारसंघात बंडखोरीची शक्यता
14
IND vs BAB, 2nd Test, Day 3 : तिसऱ्या दिवशी तरी खेळाडू मैदानात उतरणार का?
15
कोल्डप्ले तिकिट विक्री वादावर Book My Show चं स्पष्टीकरण; काळाबाजाराचा आरोप
16
मित्राकडून हातपाय बांधले, व्हिडिओ बनवला अन् कुटुंबाकडे मागितले २५ लाख, त्यानंतर...
17
IPL 2025 Player Retention Rules : MI सह CSK च्या मनासारखं; इथं पाहा नवी नियमावली
18
IIFA 2024: शाहरुख ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता तर 'हा' ठरला सर्वोत्कृष्ट सिनेमा, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
19
ही तुमच्या कर्माची फळे, जगाला दोष देऊ नका; भारतानं पाकिस्तानला सुनावले खडे बोल
20
फिनालेला आठवडा असताना बिग बॉस मराठीमध्ये मोठा बदल! ३ ऑक्टोबरपासून या नवीन वेळेत दिसणार

पतीचे छत्र हरपल्याने भाजी विकून तिला बनविले गुणवंत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2022 2:59 PM

पोरीने आईच्या कष्टाचे चीज करूऩ मिळवले यश

- तेजस टवलारकर पिंपरी : परिस्थिती कितीही बिकट असली तरीदेखील कष्ट करण्याची तयारी आणि इच्छाशक्ती असेल तर काहीही अशक्य नाही. याचा प्रत्यय आरती नलावडे या विद्यार्थिनीने दिला आहे. तिला डॉक्टर व्हायचे आहे. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असतानाच आजारपणात उपचार घेत असलेल्या वडिलांचे निधन झाले. या स्थितीतून कसे सावरायचे असा प्रश्न समोर होता. परंतु, अशा कठीण काळातही न डगमगता कोणत्याही विषयाची शिकवणी न लावता आरती विनोद नलावडे या विद्यार्थिनीने दहावीच्या परीक्षेत यश खेचून आणले. पतीचे छत्र हरपल्यानंतर आईने तिला शिकविण्यासाठी भाजी विकली. पोरीने आईच्या कष्टाचे चीज करीत दहावीच्या परीक्षेत ९२.२० टक्के गुण मिळविले

आरती ही चिंचवड स्टेशन येथील श्रीमती गेंदीबाई ताराचंद चोपडा हायस्कूल येथील विद्यार्थिनी आहे. आरतीचे वडील दीर्घकाळ आजारी होते. या आजारामुळे त्यांचे ऑगस्ट २०२० मध्ये कोरोना काळात निधन झाले. त्यावेळी आरती नववीत होती. घरी, आई, आजोबा, मोठी बहीण आणि लहान भाऊ आहे. वडिलांचे निधन झाल्यावर सुरुवातीचा एक महिना त्यातून सावरण्यातच गेला. शिकवणी लावण्यासाठी पैसे नव्हते. त्यामुळे घरीच अभ्यास करणे सुरू केले.

घरची स्थिती बेताची असल्यामुळे तिला शिकविण्यासाठी आई भाजी विकण्याचे काम करू लागली. घरी अभ्यास करताना काही अडचणी आल्यास आरती शाळेतील शिक्षकांची मदत घेत. आई तसेच घरातील सर्वच सदस्य पाठीशी उभे राहिले आणि शाळेतील शिक्षकांनी वेळोवेळी मदत केली. त्यामुळे तिला दहावीच्या परीक्षेत यश मिळाले. अकरावीमध्ये विज्ञान शाखेमध्ये प्रवेश घ्यायचा आहे. त्यानंतर नीट परीक्षेची तयारी करून डॉक्टर होण्याची इच्छा आहे, असे आरतीने सांगितले.

क्लास न लावता शाळेतच मार्गदर्शन...आरतीने मिळविलेल्या यशाबद्दल शाळेने तिचे अभिनंदन केले आहे. शाळेचे मुख्याध्यापक विक्रम काळे, पर्यवेक्षक शशिकांत हुले, वर्गशिक्षक संजीव वाखोरे यांनी परीक्षेसाठी आरतीला मार्गदर्शन केले.

आरती चिखली घरकुल येथे राहते. घर लांब असूनही ती नियमितपणे शाळेत येत होती. सांस्कृतिक कार्यक्रमात तिचा सहभाग होता. कविता, लेखन, खेळ, नृत्य यामध्येही ती हुशार आहे. महापालिकेने कोरोना काळात सुरू केलेल्या चाईल्ड हेल्पलाईनमधील तिच्या सहभागाबद्दल आयुक्तांनी कौतुक केले होते.- विक्रम काळे, प्राचार्य, श्रीमती गेंदीबाई ताराचंद चोपडा हायस्कूल, चिंचवड

टॅग्स :Puneपुणेssc examदहावीHSC / 12th Exam12वी परीक्षा