याप्रकरणी मुस्कान अस्लम बागवान (वय १९, रा. कवडीपाट टोलनाका, चांदणे वस्ती, कदमवाकवस्ती, ता. हवेली) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार मुस्कानला पैशाची आवश्यकता असल्याने त्या सकाळी ११-३० वाजण्याच्या सुमारास बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा लोणी काळभोर येथे एटीएमद्वारे पैसे काढण्यासाठी गेले. तेथे दोन इसम उभे होते. पुुुुढे असलेल्या इसमाने त्यांंना पैसे निघत नाहीत असे सांगितले व तो बाहेर निघून गेला. त्यावेळी पाठीमागे उभा असलेला एक २० ते २५ वर्षे वयाचा मुलगा तेथे आला व तो कार्ड टाका पैसे निघतात का पाहूया, असे म्हणाला. मुस्कान यांनी मशीनमध्ये कार्ड टाकले व पिन नंबर टाकला; परंतु पैसे आले नाहीत. त्यावेळी मुलगा पुढे आला व त्याने मशीनमध्ये टाकलेले कार्ड बाहेर काढले व परत दिले.
त्यानंतर मुुुस्कान यांना एटीएमला लिंक असलेला मोबाईल नंबर बदलायचा असल्याने त्या गडबडीत शेजारीच असलेल्या बँकेत गेल्या. तेथे खात्यावरील रक्कम तपासली असता खात्यावर २० रुपये शिल्लक असल्याचे समजले. परंतु खात्यावर १२ हजार २० रुपये रुपये शिल्लक असलेचे मुस्कान यांनी त्यांना सांगितले. त्यावेळी खात्याची इन्ट्री चेक करून तुमचे खात्यातून आजच १२ हजार रुपयेे काढले असल्याबाबत सांगितले. तेव्हा त्यांनी आज पैसे काढले नसल्याबाबत सांगून एटीएम कार्ड माझ्या बरोबरच असल्याचे सांगितले व दाखविले असता बँकेचे अधिकारी यांनी त्यांचे अभिलेख चेक करून सदर एटीएम कार्ड हे तुमचे नसून रामचंद्र लवंगे यांचे नावे असल्याबाबत सांगितले.
त्यानंतर त्या घरी गेेल्या. त्यावेळी त्यांना घोरपडी वस्ती येथे राहणारे योगिता नीतेश गुरखा (वय ३८, रा. स्वामी विवेकानंद सोसायटी, सत्यम पॅराडाईज, फ्लॅट नं. २०, घोरपडे वस्ती, लोणी काळभोर) यांचे बँक ऑफ महाराष्ट्र एटीएममधून ९ हजार तसेच संजय संपतराव चौधरी (वय ४८, रा. मु. पो. सोरतापवाडी, पो. नायगाव, ता. हवेली) यांचे ॲक्सेस बँकेचे कुंजीरवाडी येथील एटीएममधून २० हजार रुपये याचप्रकारे काढून घेतल्याचे समजले. सदर अनोळखी इसमाविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे.