माऊली शिंदेकोरेगाव पार्क : ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयांतर्गत दहा लाख रुपये खर्च करून भगवान गौतम बुद्ध यांचे शिल्प ताडीवाला रोड येथील मिलिंद बुद्ध विहार येथे बसवण्यात आले अशी कागदोपत्री नोंद होती. मात्र, प्रत्यक्षात जागेवर शिल्प नव्हते. या अदृश्य शिल्पाचे बिल ठेकेदाराला का अदा केले, याची विचारणा क्षेत्रीय अधिकाºयांना केल्यानंतर, रातोरात शिल्प अवतरले. शिल्प न लावता सात महिन्यांपूर्वी संबंधित ठेकेदाराला बिल अदा केल्यामुळे क्षेत्रीय कार्यालयाच्या कारभाराबाबत संशय व्यक्त केला जाऊ लागला आहे.ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयातंर्गत मिलिंद बुद्ध विहार आणि कैलास स्मशानभूमी येथे गौतम बुद्ध यांचे शिल्प बसविण्यासाठी दहा लाखांची निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानुसार ठेकेदाराने मार्चमध्ये मिलिंद बुद्ध विहार ताडीवाला रोड येथे शिल्प बसवले होते. संबंधित शिल्पासाठी ठेकेदाराला दहा लाख रुपयांची रक्कम ३१ मार्चला देण्यात आली. मात्र, प्रत्यक्षात जागेवर शिल्प नसल्याचे समोर आले. दहा लाखांचे शिल्प गेले कोठे याची माहिती सहायक आयुक्त अरुण खिलारे यांना विचारल्यानंतर त्यांनी चौकशी करून माहिती देतो असे सांगितले.खिलारे यांच्या चौकशीमध्ये प्रत्यक्षात जागेवर शिल्प नसल्याचे समोर आले. याबाबत अधिक माहिती घेतो असे त्यांनी कळविले. दरम्यान क्षेत्रीय कार्यालयातील कनिष्ठ अभियंता विजय देवकाते यांनी याबाबत माहिती देण्यासाठी सुमारे आठ दिवस विलंब केला. या काळामध्ये नवीन शिल्प तयार करून रातोरोत मिलिंद बुद्ध विहारामध्ये बसविण्यात आले. शिल्प बसविल्यानंतर देवकाते यांनी सांगितले, की पूर्वी लहान आकाराचे शिल्प बसवले होते. माननीयांना ते शिल्प आवडले नसल्याने मोठ्या आकाराचे शिल्प बसविले आहे.माहिती देण्यासअधिकाºयाची टाळाटाळमार्चमध्ये ठेकेदारांनी लहान आकाराचे शिल्प बसवले होते, तर ठेकेदाराला दहा लाख रुपये का देण्यात आले? शिल्पाचा आकार कमी करून पालिकेची फसवणूक करणाºया ठेकेदारावर कारवाई का केली नाही? लहान आकाराचे शिल्प मिलिंद बुद्ध विहारामध्ये बसविले असल्याचा फोटो किंवा इतर पुरावे क्षेत्रीय कार्यालयाकडे का नाहीत? मार्चपासून शिल्प गायब आहे, याबाबत अभियंत्यांनी ठेकेदारांकडे पाठपुरावा किंवा पत्रव्यवहार का केला नाही. दहा लाखांमध्ये एक लहान व एक मोठे असे दोन शिल्पे बसवण्यासाठी ठेकेदार पालिकेवर का उदार झाला? शिल्प बनवणाºया कलाकारांची माहिती अधिकाºयांकडे का नाही? पावती न पाहताच अधिकाºयांनी ठेकेदाराला दहा लाख रुपये का दिले? शिल्प गायब झाल्याची तक्रार केल्यानंतर आठवडाभरात शिल्प मिलिंद बुद्ध विहारामध्ये कसे अवतरले?
सात महिन्यांनंतर अवतरले गौतम बुद्धांचे शिल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2017 7:12 AM