पुणे: वय वर्षी १२ गर्दीत वाट काढून तो पुढे सरकत होता. पोलिसांनी त्याला अडवले तर तो म्हणाला मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना बघायला आलो आहे. वाढती गर्दी आणि पडणार पाऊस यामध्ये पंतप्रधानांना पाहण्याची उत्सुकता तरुणांमध्ये देखील अधिक वाढत होती. मात्र, पंतप्रधान आपल्या ताफ्यात सरळ गेले ते दिसलेच नसल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सकाळी सव्वा अकराच्या सुमारास दगडूशेठ मंदिरात आले. त्यावेळी त्यांना पाहण्यासाठी पोलिसांनी लावलेल्या बॅरिकेट्सपाशी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. या गर्दीत तरुणांसोबत महिलांची संख्या देखील लक्षणीय होती. पंतप्रधान गाडीतून किंवा खाली उतरून लोकांना अभिवादन करतील आणि त्यांची एक छलक पाहण्यास मिळेल, अशी अपेक्षा त्यांना पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांना होती. मात्र, त्यांच्या गाड्यांच्या ताफा सरळ पुढे गेला त्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली.
''माझे वय १२ वर्ष असून मी दीड तास उभा राहून पंतप्रधांनी वाट पाहत होता. पंतप्रधान जवळून कसे दिसतात याची उत्सुकता मला होती. ते गाडीतून उतरून सर्वांना अभिवादन करतील असे वाटले होते. मात्र, त्यांची गाडी न थांबताच गेली याचे वाईट वाटते. ते परत पुण्यात आले की मी त्यांना पुन्हा पाहण्यासाठी जाईल.- श्रीयोग कराळे, विद्यार्थी''
''मी नववीत शिकत आहे. मित्रांसोबत पंतप्रधांनाना पाहण्यासाठी आलो होतो. पंतप्रधान गाडीतून तरी हात करतील अशी अपेक्षा होती मात्र, गाडी सरळ निघून गेली. पोलिसांनी खुप लांब थांबवल्याने थोडा नाराज होतो. - स्वयंम उमरदंड, विद्यार्थी''
''मी मुळची सातारा येथील आहे. नातेवाईकांकडे पुण्यात आले होते. पंतप्रधान मोदी दिसतील या अपेक्षेने दगडूशेठ मंदिर परिसरात आले होते. पंतप्रधान दिसतील याची खात्री होती. ते गाडीतून खाली नाही उतरले तरी गाडीत बसलेले तरी दिसतील अशी अपेक्षा होती. मात्र, पोलिसांनी खुप लांब थाबंवले होते. शिवाय पंतप्रधानांच्या गाडीच्या काचा देखील लावलेल्याच होत्या. त्यामुळे निराशा झाली. - पुनम तिवाटने, गृहिणी''