लोकसभा,विधानसभेपाठोपाठ स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीत ‘साहेबां’ची राष्ट्रवादी ठोकणार शड्डु

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2024 07:47 PM2024-12-11T19:47:06+5:302024-12-11T19:49:58+5:30

आभार दाैऱ्यात युगेंद्र पवार यांचे संकेत

After the Lok Sabha, Vidhan Sabha, the local self-government body elections, the NCP will defeat 'Saheb'. | लोकसभा,विधानसभेपाठोपाठ स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीत ‘साहेबां’ची राष्ट्रवादी ठोकणार शड्डु

लोकसभा,विधानसभेपाठोपाठ स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीत ‘साहेबां’ची राष्ट्रवादी ठोकणार शड्डु

बारामती  - शाश्वत विकासाचा अजेंडा घेऊन आपण लढलो. ही लढाई सोपी अजिबात नव्हती. तरीही आपण निर्धाराने लढलो, याचे समाधान आहे. यापुढील काळातही आपली साथ आणि सोबत कायम ठेवा. आगामी काळात सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आपण लढणार असून त्या जिंकूनही दाखवू, असा विश्वास युगेंद्र पवार यांनी व्यक्त केला आहे.

बारामती तालुक्यातील आभार दाैर्यात पवार बोलत होते.यावेळी युगेंद्र पवार पुढे म्हणाले, पवार साहेब आणि सुप्रियाताई सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली जनतेसाठी यापुढेही कायम कार्यरत राहीन. तसेच सर्वसामान्यांच्या सेवेसाठी सतत उपलब्ध असेन. आता आपल्याला संघटना मजबूत करून आगामी काळात सर्व निवडणुकांना सामोरे जावे लागणार असल्याचे ते म्हणाले.

निवडणूकीचा निकाल काहीही असला तरी गावोगावी आपण पाहिलेल्या समस्या व अडचणी दूर करण्याचा आपल्या परीने प्रामाणिक प्रयत्न करूयात. तसेच भविष्यात सुरक्षित व गुन्हेगारी मुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. या निवडणुकीने खूप काही शिकवले आहे. यामध्ये आलेल्या अनुभवांचा फायदा आगामी निवडणुकीत नक्की होईल. तसेच तालुक्यातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभा राहणार असून, आपल्याला मतदान करणाऱ्या जनतेचे ऋण कधीही फेडता येणार नाही. त्यामुळे यापुढे देखील जनतेची सेवा करत राहणार आहे, असे युगेंद्र पवार यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्षाचे विविध पदाधिकारी व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

विधानसभा निवडणूक निकालानंतर युगेंद्र पवार यांचा आभार दौरा सुरू असून ते दररोज आठ ते दहा गावांना भेटी देत स्थानिकांशी संवाद साधून आभार व्यक्त करीत आहेत. या आभार दौऱ्याच्या माध्यमातून युगेंद्र पवारांचे पुन्हा सक्रीय होण्याचे संकेत मिळत आहेत. 

Web Title: After the Lok Sabha, Vidhan Sabha, the local self-government body elections, the NCP will defeat 'Saheb'.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.