पुणे : गोवर आणि रुबेला रोगांविरोधी मोहीम म्हणून सध्या शाळांमध्ये लसीकरणाची मोहीम सुरू आहे. परंतु, या मोहिमे दरम्यान दत्तवाडीमधील अग्रवाल शाळेमध्ये लसीकरणानंतर सात मुलांना श्वास घ्यायचा त्रास व उलट्यांचा त्रास झाला आहे. ३३७ विद्यार्थ्यांना ही लस देण्यात आली. क्षेत्रीय अधिकारी सिंहगड रोड यांनी लस दिली. त्याबाबत डॉक्टरांनी सांगितले रोग प्रतिकार शक्ती कमी असल्याने त्यांना हा त्रास निर्माण झाला. त्यांना दत्तवाडी येथील खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. एकूण ७ विद्यार्थींपैकी ३ मुले ४ मुलींचा समावेश आहे. मुलींमध्ये श्रद्धा मेमाणे (वय १०), प्रगती शिरसाठ (वय १२),मृन्मई खोले (वय १०), मुलांमध्ये दलवीर भगतसिंग (वय १२), राघीन वारे (वय १०), सिद्धार्थ खोल (वय ८), जय चव्हाण (वय १२) यांचा समावेश आहे. मुलांची प्रकृती चांगली असून संध्याकाळपर्यंत त्यांना सोडण्यात येणार आहे, असे उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले.
गोवर , रुबेला लसीकरणानंतर काही विद्यार्थ्यांना त्रास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2018 6:42 PM
सध्या शाळांमध्ये गोवर आणि रुबेला रोग प्रतिबंधक लसीकरणाची मोहीम सुरू आहे.
ठळक मुद्देलसीकरणानंतर सात मुलांना श्वास घ्यायचा त्रास व उलट्यांचा त्रास