पुणे : जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघात सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. अपेक्षेनुसार ग्रामीण भागात मतदानाचा उत्साह जाणवत असून शहरी भागात मात्र दुपारच्या वेळेत मतदान कमी झाल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात तीन वाजेपर्यंत ४१.७० टक्के मतदान झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. सर्वाधिक मतदान मावळ मतदारसंघात ४९.७५ टक्के झाले आहे. मावळसह जुन्नर आंबेगाव इंदापूर मध्येही ४९ टक्क्यांच्या वर मतदान झाल्याची आकडेवारी जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. शहरात मात्र अपेक्षेनुसारच दुपारच्या वेळेत मतदान कमी झाले आहे. अखेरच्या टप्प्यात शहरी भागात मतदान वाढण्याची शक्यता आहे. पिंपरी मतदारसंघात सकाळपासूनच कमी मतदानाची नोंद होत असून दुपारी तीन वाजेपर्यंत जिल्ह्यातील सर्वात कमी मतदान ३१.५८ टक्के मतदानाची नोंद झाली.
ग्रामीण भागात सकाळपासून मतदारांच्या रांगा नव्हत्या. मात्र, ११ नंतर रांगा दिसून आल्या. त्यामुळे ग्रामीण भागातील बहुतांश मतदारसंघात चांगले मतदान झाले आहे. तर शहरी मतदारसंघात सुरुवातीला रांगा होत्या. तर त्यानंतर मतदारांनी कार्यालये गाठल्याने मतदानाचा टक्का कमी झाला आहे. शहरात सर्वाधिक ४३.०३ कसबा मतदारसंघात झाले आहे. खडकवासला मतदारसंघात काही भाग ग्रामीणचा असल्याने येथे मतदानाचा टक्का ४०.४० इतका आहे. तर सर्वात कमी ३३.७८ टक्के मतदान हडपसर मतदारसंघात झाले आहे.
२१ विधानसभा मतदारसंघातील सकाळी सात ते दुपारी ३ पर्यंतच्या ४ टप्प्यातील मतदान टक्क्यांत
जुन्नर : ५.२९, १८.५७, ३४.५८, ४९.२९आंबेगाव : ५.७९, १६.६९, ३५.६३, ४९.५५खेड आळंदी ४.७१, १६.४०, ३२.०२, ४७.४३शिरूर ४.२७, १६.४४, २८.६६, ४३.६०दौंड ५.८१, १७.२३, ३१.७८, ४६.७०इंदापूर ५.०५, १६.२०, २९.५०, ४९.५०बारामती ६.२०, १८.८१, ३३.७८, ४३.५७पुरंदर ४.२८, १४.४४, २७.३५, ४०.३२भोर ४.५०, १२.८०, ३०.२७, ४७.५४मावळ ६.०७, १७.९२, ३४.१७, ४९.७५चिंचवड ६.८०, १६.९७, २९.३४, ४०.४३पिंपरी ४.०४, ११.४६, २१.३४, ३१.४८भोसरी ६.२१, १६.८३, ३०.४१, ४३.१६वडगाव शेरी ६.३७, १५.४८, २६.६८, ३८.८३शिवाजीनगर ५.२९, १३.२१, २३.४६, ३३.८६कोथरूड ६.५०, १६.०५, २७.६०, ३७.८०खडकवासला ५.४४, १७.०५, २९.०५, ४०.४०पर्वती ६.३०, १५.९१, २७.१९, ३७.६६हडपसर ४.४५, ११.४६, २४.१५, ३३.७८पुणे कॅन्टोन्मेंट ५.५३, १४.१२, २५.४०, ३५.८४कसबा ७.४४, १८.३३, ३१.६७, ४३.०३एकूण ५.५३, १५.६४, २९.०३, ४१.७०