शहरं
Join us  
Trending Stories
1
सिद्दिकींच्या हत्येनंतर केंद्रीय यंत्रणा सज्ज! शरद पवारांना झेड प्लस सुरक्षा घेण्यासाठी केंद्राचा आग्रह
2
११५ जणांच्या नावांची शिफारस, दिल्लीत बैठकांचे सत्र; आज किंवा उद्या भाजपाची पहिली यादी येणार?
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "राणे कुटुंबीयांचा त्रास, लोकसभा, विधानसभा...";राजन तेलींनी आरोप करत घेतला मोठा निर्णय
4
खळबळजनक! पोस्ट ऑफिसमधील १५०० लोकांच्या खात्यातून अचानक लाखो रुपये झाले गायब अन्...
5
IND vs NZ: पंत किपिंगला आलाच नाही! ध्रुव जुरेलने घेतली जागा; 'त्या' फोटोने वाढवली चिंता
6
एमआयएममुळे आता काँग्रेसचे वाढले टेन्शन; नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत रंगत 
7
वडिलांकडून पैसे घेतले उधार, छोट्या खोलीत सुरू केलं काम; बहिणींनी उभी केली ३५०० कोटींची कंपनी
8
“रवी राणा यांच्यामुळेच नवनीत राणा खासदार होऊ शकल्या नाहीत”; बच्चू कडूंचा थेट प्रहार
9
डेटिंग ॲपद्वारे फसवणुकीचे जाळे; पुण्यासह नागपूर आणि दिल्लीतही हनी ट्रॅपद्वारे लुटण्याचे प्रकार उघडकीस
10
बाप-बेटी एकाचवेळी नशीब अजमावणार; निवडणूक शिवाजीनगरमधून लढणार?
11
Jasprit Bumrah नंबर वन! एक विकेट घेताच नावे झाला खास विक्रम; अश्विनला टाकलं मागे
12
५०० च्या नोटांवर अनुपम खेर यांचा फोटो का छापला?; आरोपीचं उत्तर ऐकून बसेल मोठा धक्का
13
३२ टक्क्यांपर्यंत घसरला TATA च्या 'या' कंपनीचा नफा; आता शेअर विकण्यासाठी गुंतवणूकदारांच्या रांगा
14
"बाबा सिद्दीकी चांगला माणूस नव्हता, त्यांच्यावर..."; लॉरेन्स बिश्नोईच्या शूटरचे धक्कादायक वक्तव्य
15
समीर वानखेडेंना शिंदेसेनेचा नकार, संजय शिरसाट यांनी स्पष्टच सांगितलं 
16
Diwali 2024: कसे करावे देवाच्या जुन्या, भग्न मूर्ति आणि फोटोंचे विघटन? वाचा शास्त्रशुद्ध उपाय!
17
मुख्यमंत्र्यांची भेट झाली आणि मेळावाच रद्द झाला; ठाणे जि.प. च्या माजी उपाध्यक्षांना मुरबाड देणार?
18
Diwali 2024: दिवाळीत घरबरोबरच मनाची स्वच्छता कशी करायची ते सांगताहेत गौर गोपाल दास!
19
राहुचे नक्षत्र गोचर: ५ राशींना लॉटरी, धनलाभाचे योग; स्वप्नपूर्ती, पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ!
20
या संघानं ४५ धावांत All Out झाल्यावर जिंकली होती टेस्ट; टीम इंडियाला ते शक्य होईल?

Aga Khan Palace: आगाखान पॅलेसमधील बाग पुन्हा फुलणार; महापालिकेने उपलब्ध करून दिला 'हा' पर्याय

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2022 12:53 PM

पुणे : राष्ट्रीय स्मारक असलेल्या आगाखान पॅलेसच्या परिसरातील महात्मा गांधीनी फुलवलेली बाग पाण्याअभावी कोमेजली होती. पाणीपट्टीची थकबाकी न भरल्याने ...

पुणे : राष्ट्रीय स्मारक असलेल्या आगाखान पॅलेसच्या परिसरातील महात्मा गांधीनी फुलवलेली बाग पाण्याअभावी कोमेजली होती. पाणीपट्टीची थकबाकी न भरल्याने महापालिकेने या बागेचा पाणीपुरवठा बंद केला होता. परिणामी पर्यटकांना कोमजलेली बाग पाहायला मिळत होती. त्यावर उपाय म्हणून बागेला पाणी पुरवण्यासाठी महापालिकेने पर्याय उपलब्ध करून दिला आहे. आगाखान पॅलेसमधील सुकलेल्या बागेला महापालिकेने टँकरद्वारे पाणी उपलब्ध करून दिले आहे. तसेच महापालिकेच्या मैलापाणी शुद्धीकरण केंद्रांमधून शुद्ध केलेले पाणी बागेसाठी मोफत देण्यात येणार असून, पॅलेस व्यवस्थापनाने ते टँकरद्वारे घेऊन जावे असे आवाहन केले आहे. 

दरम्यान, आगाखान पॅलेसच्या व्यवस्थापनाने अरकॅलॉजी डिपार्टमेंटच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून थकीत असलेली दोन कोटी रुपयांची पाणीपट्टी भरण्यासाठी तातडीने पावले उचलली जातील असे आश्वासन महापालिकेला दिले आहे. 

आगाखान पॅलेसला महापालिकेने तीन नळजोड दिले असून, यापैकी बागेसाठी वापरण्यात येणारा नळजोड महापालिकेने पाणीपट्टीची थकबाकी न भरल्याने तोडला होता. यामुळे बागेला पाणी मिळत नसल्याने, पाण्याअभावी बाग सुकली असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. पॅलेस व्यवस्थापनाला वारंवार सूचना करूनही थकबाकी न भरणाऱ्या आगाखान पॅलेस व्यवस्थापनाशी महापालिकेने चर्चा केली. तसेच महापालिकेच्या धोरणानुसार बागेच्याकरीता प्रक्रिया केलेले पाणी टँकरद्वारे याठिकाणी महापालिकेने आज उपलब्ध करून दिले आहे़ येथून पुढेही महापालिकेच्या जवळच्या एसटीपी प्रकल्पातून शुद्ध केलेले पाणी आगखान पॅलेसला मोफत उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली आहे. 

टॅग्स :PuneपुणेMahatma Gandhiमहात्मा गांधीtourismपर्यटनPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका