शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

धनगर आरक्षणाचे प्रतिज्ञापत्र सादर करण्यास विरोध

By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2019 5:00 PM

निवडणुकीच्या तोंडावर धनगर समाजाला खुष करण्यासाठी आदिवासी समाजाचे आरक्षण धोक्यात आणून धनगर समाजाची दिशाभूल करू नये...

ठळक मुद्देआदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेने धनगर आदिवासी नसल्याचे स्पष्टपणे केले सिध्द आदिवासी वसतीगृहासाठी सुरू करण्यात आलेली डीबीटी योजना तात्काळ बंद करून मेस करावी सुरू आदिवासींचे वळविण्यात आलेले बजेट पुन्हा आदिवासींना परत द्यावे

पुणे : धनगर  हेच धांगड आदिवासी असे, संविधान विरोधी व आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेने दिलेला अहवाल डावलणारे खोटे प्रतिज्ञापत्र  येत्या 12 मार्च रोजी उच्च न्यायालयात दाखल करण्याच्या शासनाच्या निर्णयाचा आदिवासी हक्क संरक्षण समितीने शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तिव्रनिषेध करण्यात आला आहे. तसेच निवडणूकीच्या तोंडावर धनगर समाजाला खुष करण्यासाठी आदिवासी समाजाचे आरक्षण धोक्यात आणून धनगर समाजाची दिशाभूल करू नये, असे आवाहन समितीने केले आहे.आदिवासी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता धनगर समाजाला आरक्षण देऊ, असे शासनातर्फे सांगितले जात आहे. परंतु, मुळात धनगर आदिवासी नाहीतच हे प्रखर वास्तव असल्याने कोणत्याही परिस्थितीत धनगरांचा समावेश आदिवासींमध्ये होऊ शकत नाही. केवळ धनगर समाज आंदोलन करत असल्याने काही मतदार संघात त्यांचे मतदान निवडणूकीवर परिणाम करू शकते, या भीतीने शासन संविधान पायदळी तूडवून धनगर समाजाचा समावेश आदिवासींमध्ये करत आहे. आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेने धनगर आदिवासी नसल्याचे स्पष्टपणे सिध्द केले आहे. त्याचप्रमाणे संविधानातील पाचव्या अनुसूचीतील तरत्युदीनुसार आदिवासी सल्लागर परिषदेची मान्यता घेतल्याशिवाय कोणत्याही जातीचा समावेश आदिवासींच्या यादीत करता येत नाही. तरी सुध्दा महाराष्ट्राच्या आदिवासी यादीत 36 व्या क्रमांकावर असलेल्या ओरान धांगड ही जमात म्हणजे ह्यधनगर ह्णअसे प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर करून शासनाकडून संविधानाची पायमली केली जात आहे.त्यामुळे आदिवासी हक्क संरक्षण समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.ओरान धांगड ही जमात म्हणजेच धनगर असे संविधान डावलणारे प्रतिज्ञापत्र राज्य शासनाने सादर करू नये.तसेच याबाबतचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवू नये. आदिवासी समाजात इतर जमातींचा समावेश करण्यासाठी असलेल्या संविधानिक व कायदेशीर प्रक्रिया काटेकोरपणे पाळाव्यात. धनगर समाजासाठीच्या योजना आदिवासी विकास मंत्रालयाकडून राबवू नये आणि आदिवासींच्या बजेटला हात लावू नये, आदी प्रमुख मागण्या समितीतर्फे करण्यात आल्या. त्याचप्रमाणे आदिवासी वसतीगृहासाठी सुरू करण्यात आलेली डीबीटी योजना तात्काळ बंद करून मेस सुरू करावी. पुणे शहरात मध्यवर्ती भागात वसतीगृह सुरू करावेत.आदिवासींचे वळविण्यात आलेले बजेट पुन्हा आदिवासींना परत द्यावे,आदी मागण्याही यावेळी करण्यात आल्या.

टॅग्स :PuneपुणेDhangar Reservationधनगर आरक्षणTrible Development Schemeआदिवासी विकास योजना