शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
4
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
5
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
6
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
7
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
8
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
9
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
10
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
11
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
12
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
13
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
14
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा
15
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
16
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
17
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
18
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
19
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
20
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!

वय १९ वर्ष इन मीन आणि दाखल गुन्हे दोनशे तीन 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2019 10:17 PM

पुणे शहर व पुणे ग्रामीण पोलिसांना गेल्या अनेक वर्षांपासून दरोडे, जबरी चोरी, घरफोडी, वाहनचोरी करुन गुंगारा देऊन धुमाकुळ घालणाऱ्या अट्टल दरोडेखोरास त्याच्या दोन साथीदारासह हडपसर पोलिसांनी जेरबंद केले आहे़. पैतरसिंग उर्फ पवित्रसिंग टाक याचे आता वय १९ वर्षाचे असले तरी त्याच्यावर २०३ गुन्हे आहेत़.

पुणे : पुणे शहर व पुणे ग्रामीण पोलिसांना गेल्या अनेक वर्षांपासून दरोडे, जबरी चोरी, घरफोडी, वाहनचोरी करुन गुंगारा देऊन धुमाकुळ घालणाऱ्या अट्टल दरोडेखोरास त्याच्या दोन साथीदारासह हडपसर पोलिसांनी जेरबंद केले आहे़. 

 याबाबत पोलीस सहआयुक्त रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त सुनिल फुलारी, उपायुक्त सुहास बावचे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रघुनाथ जाधव यांनी माहिती दिली. पैतरसिंग उर्फ पवित्रसिंग टाक याचे आता वय १९ वर्षाचे असले तरी त्याच्यावर २०३ गुन्हे आहेत़. त्यातले ८६ गुन्हे हे अल्पवयीन असताना दाखल झाले आहेत. पुणे शहर व पुणे ग्रामीण पोलिसांना गेल्या अनेक वर्षांपासून दरोडे, जबरी चोरी, घरफोडी, वाहनचोरी करुन गुंगारा देऊन धुमाकुळ घालणाऱ्या अट्टल दरोडेखोरास त्याच्या दोन साथीदारासह हडपसर पोलिसांनी जेरबंद केले आहे़. याशिवाय त्याच्यावर बाल गुन्हेगार म्हणून अनेक गुन्हे दाखल होते़. अगदी वयाच्या १२ -१३ वर्षाचा असल्यापासून तो वडिलांबरोबर गुन्हे करु लागला़. त्याचे वडिल गब्बरसिंग टाक याच्यावर १५० हून अधिक गुन्हे होते़. पवित्रसिंग याचा चुलता गागासिंग टाक याच्यावरही १०० हून अधिक गुन्हे दाखल आहेत़.  त्याचा चुलत भाऊ गोरखसिंग टाक हा सध्या तुरुंगात असून त्याच्यावरही असंख्य गुन्हे आहेत़.  त्याचा भाऊ तिलकसिंग गब्बरसिंग टाक हा सध्या जामीनावर सुटका असून त्याच्यावरही १०० हून अधिक गुन्हे दाखल आहेत़.  विशेष म्हणजे त्याच्या आईवरही गुन्हे दाखल आहेत़.  रामटेकडी भागात ते राहतात़ तेथे त्यांची दहशतही आहे़. 

सदैव शस्त्रधारी, वेगाची नशापैतरसिंग याला गाड्यांची प्रचंड क्रेझ आहे़.  तो बाहेर पडताना शस्त्र जवळ बाळगत असतो़. चोऱ्या करण्याबरोबरच वेगवेगळ्या कार वेगाने चालविण्याची नशा आहे़.  तो वेगाने गाड्या पळवत असे़.  त्याला पकडणे अनेकदा पोलिसांना शक्य झाले नाही़.  तो जशी वेगाने गाडी चालवितो, त्याचप्रमाणे त्याच वेगात तो रिव्हर्स गाडीही तशीच वेगाने चालवू शकतो़.  विशेष म्हणजे तो एका गुन्ह्यात वापरलेली गाडी पुन्हा लगेचच दुसऱ्या गुन्ह्यासाठी कधी वापरत नाही़.  गुन्ह्यात वापरलेली गाडी तो नंतर सोडून देतो़. तुरुंगात ओळखपैतरसिंग हा बाल गुन्हेगार म्हणून रिमांड होममध्येही होता़, पण तरीही तो सुधारला नाही़, घरातील सर्वच गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याने तोही त्यांच्यात ओढला गेला़. तुरुंगात असताना त्याची निशांत आणि ऋषिकेश यांच्याशी ओळख झाली़ बाहेर पडल्यावर ते एकत्र घरफोड्या करु लागले़ . रेकी करुन करीत असे घरफोडीपैतरसिंग व त्याचे साथीदार अगोदर जेथे सुरक्षा रक्षक नाही, अशा मध्यम स्वरुपाच्या सोसायट्यांमध्ये जाऊन रेकी करीत बंद असलेली घरे हेरत आणि त्यानंतर कारमधून त्या सोसायटीत जात़.  कारमधून आल्याने त्यांच्याविषयी कोणाला संशय येत नसे़.  घरफोडी, जबरी चोरी असे गुन्हे करताना तो नेहमी त्याचे साथीदार बदलत असे़, त्यामुळे तो गेली दीड वर्षे पोलिसांना गुंगारा देऊ शकला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसRobberyचोरी