पुणे : जिद्दीला वय, लिंग, धर्म असे कोणतेही भेद नसतात. असते ती फक्त दुर्दम्य इच्छाशक्ती. अशीच ईच्छाशक्ती दाखवत पुण्यातील वासंती जोशी या ५६ वर्षांच्या महिलेने १९ हजार ३०० फूट यांनी कन्याकुमारी ते लेह असा प्रवास करणार आहेत. एकूण ४० दिवस असणारा हा प्रवास त्या सायकलवरून करणार असून कन्याकुमार ते लेह या मार्गाचा वापर करणार आहेत.जोशी या पुण्यातील एनएसडीटी महाविद्यालयात प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र गर्ल्स बटालियटनमध्ये त्यांनी काहीकाळ सेकंड लेफ्टनंट पदावर काम केले आहे. सायकलवरून करणाऱ्या या प्रवासाचे त्यांचे घोषवाक्य भीतीवर विजय असे आहे. २८ मे रोजी त्यांच्या मोहिमेला सुरुवात होणार आहे.या प्रवासातील आधुनिक स्त्री सशक्तीकरणाचे प्रतीक म्हणून १९ हजारे ३०० फुटावरील उमलिंग खिंडीत त्या एसएनडीटी विद्यापीठाचा झेंडा त्यांना फडकावणार आहेत.
जोशी यांनी यापूर्वी सायकलवरून २हजार ७२५ किलोमीटर अंतर असलेली नर्मदा परिक्रमा २७ दिवसात पूर्ण केली आहे.तसेच लेह ते श्रीनगर, लेह ते सियाचीन बेस आणि मनाली ते लेह अशीही सायकल सफर केली आहे. याबाबत जोशी यांच्याशी संपर्क साधल्यावर त्यांनी या प्रवासासाठी वय आडवे येत नसल्याचे सांगितले. उलट तरुण विद्यार्थींनींसोबत राहून मनाने अजून तरुण वाटते आणि ऊर्जा मिळते असा अनुभव सांगितला. या मोहिमेसाठी त्या दररोज वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम करत असून बास्केटबॉलही खेळतात. इतकेच नव्हे तर जानेवारीपासून त्या आवर्जून २५ ते १५० किलोमीटरपर्यंत सायकलिंगचा सराव करतात. या काळात दररोज किती प्रवास करणार याचे नियोजन केले नसून शरीर आणि निसर्ग साथ देईल तशी मोहीम पूर्ण करणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.