कळस : इंदापूर तालुक्यातील खडकवासला कालव्यालगतची पिके आता जळून चालली आहेत. एकीकडे पावसाने पाठ फिरविल्याने दुष्काळसदृष्य परिस्थिती निर्माण झालेली असताना, दुसरीकडे पाटबंधारे विभागाकडून कालव्याचे पाणी देण्यासाठी चाललेला वेळकाढूपणा यामुळे शेतकरी संताप व्यक्त करत आहे.तालुक्यातील खरीप वाया गेला असताना आता रब्बीही वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे या भागातील शेतकऱ्यांचे वार्षिक अर्थकारण पूर्णपणे कोलमडले आहे. पावसाने मारलेली दडी व पाटबंधारे विभागाची उदासिनता यामुळे तालुक्यातील खडकवासला कालव्याच्या लाभक्षेत्रातील ३६ गावांना यंदा भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कालव्याच्या जीवावर या गावांतील सुमारे ४२ पाझर तलाव भरता येणे शक्य आहे. मात्र सध्या हे तलाव पूर्णपणे कोरडे पडले आहेत. तालुक्यातील २२ हजार हेक्टर क्षेत्राला खडकवासला कालव्याच्या पाण्याचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या लाभ होतो कालवा व त्यावरील वितरिकांच्या माध्यमातून शेतकºयांना शेतीसिंचनासाठी पाणी उपलब्ध करुन दिले जाते. मात्र सध्या कालव्याच्या आवर्तनाची गरज असताना, शेतकºयांकडून पाण्याची मागणी होत असताना, अद्यापही कालव्याचे पाणी तालुक्याला देण्यात आले नाही.खडकवासला कालव्याचा पट्टा हा अवर्षण प्रवण क्षेत्र म्हणूनही ओळखला जातो. या पट्ट्यात तालुक्याच्या इतर भागाच्या तुलनेत पर्जन्यमान कमी असते. यामुळे या भागाला खडकवासला कालव्याचा मोठा आधार आहे. मात्र कालव्याला पाणीच वेळेवर येत नसल्याने या भागातील शेतकरी मेटाकुटीला आला आहे. पिण्याच्या पाण्याच्या योजना अवलंबून असेलेले अनेक पाझर तलाव कोरडे पडले आहेत. मात्र पाटबंधारे विभागाने सध्या नियमावर बोट ठेवत तलावांत पाणी सोडता येणार नसल्याची भूमिका घेतली आहे. तर उभी पिके जळून जात असतानाही पिकांना पाणी दिले जात नसल्याची बाब नियमबाह्ण नाही का असा सवाल संतप्त शेतकरी व्यक्त करत आहेत.कालव्याच्या पाण्याचे राजकारण...इंदापूर तालुक्यात कालव्याच्या पाण्यावरून नेहमीच राजकारण झाले आहे. आता हा विषय राज्याच्या राजकारणापर्यंत पोचल्याची चर्चा आहे. अधिकारी नियमबाह्ण पध्दतीने वागत असल्याचाही आरोप होत आहे. मात्र ज्या कालव्यासाठी शेतकºयांनी स्वत:च्या जमिनी दिल्या, धरणग्रस्तांना पुनर्वसनासाठी जमिनी दिल्या, त्या शेतकºयांना सध्या पाण्यापासून वंचित ठेवले जात आहे. ही बाब तालुक्यातील शेतकºयांवर अन्यायकारक आहे. विरोधक सत्ताधाºयाला कोंडीत पकडण्यासाठी खडकवासला कालव्याच्या पाण्यावर बोलत शब्द नाहीत. तर शेतकºयांच्या माध्यमातून सत्ताधारी आमदार पाण्यासाठी आंदोलन करण्याचा तयारीत आहेत.पश्चिम पुरंदरमध्ये कमी पावसाने खरिप पिके धोक्यातगराडे : पश्चिम पुरंदर कमी पावसाने पाणीसाठ्यांची अवस्था जैसे थे च आहे.निम्मा पावसाळा संपून गेला तरी जोरदार पाऊस न झाल्याने ओढ्या- नाल्यांना पूर आलेला नाही.विहीरी,पाझर तलावात जेमतेम पाणीसाठा आहे.त्यातच पावसाने गेल्या वीस दिवसांपासून दडी मारल्याने खरिपांच्या पिकांना धोका निर्माण झाला आहे.पुरंदर तालुक्याच्या पश्चिम भागातील पिके कडक उन्हामुळे अक्षरश: होरपळून निघत आहे. पालेभाज्या शेतातच करपून गेल्याने आर्थिक फाटकाही बसला आहे.पिकांनी माना टाकल्या आहेत.त्यामुळे शेतक?्यांची चिंता वाढली आहे.पश्चिम पुरंदरमधील भिवरी ,गराडे ,बोपगाव ,चांबळी ,हिवरे,कोडीत,भिवडी,दिवे,सोनोरी परिसरात कमी पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. क-हा ही पुरंदरची जीवनवाहिनी आहे. पश्चिम पुरंदर मध्ये क-हा नदीचा उगम आहे.क-हेची उपनदी चरणावती आहे.गेल्यावर्षी खरिप हंगामात जोरदार पर्जन्यवृष्टी होवून सर्व नदी-नाले,ओढे तुडुंब भरुन वाहिले होते.परंतु यंदा पाऊस पडतोय.पण नुसती भूरभूर.त्यामुळे परिसरातील गवत,रानटी वनस्पती भरपूर वाढलेय. जोरदार पाऊस पडला नाही.त्यामुळे पूर आलेला नाही.कमी पावसामुळे पाणीसाठ्याची स्थिती जैसे थे च आहे.या परिसरात दुष्काळाचे सावट जाणवू लागले आहे.पाऊस पडला नाहीतर खरिप हंगाम वाया जाणारआहे.रब्बी हंगामाची चाहूल लागली आहे.आणि आताच रब्बीचे नियोजन कसे करावे यासाठी बळीराजाच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.शेतीच्या पाणीप्रश्नावर करणार रास्ता रोकोबावडा : खडकवासला कालव्यातून तरंगवाडी ते मदनवाडी पर्यंतचे सर्व पाझर तलाव भरून द्यावेत व शेतीसाठी तरंगवाडी ते शेटफळ गढे पर्यंत तातडीने आवर्तन द्यावे. शेटफळ हवेली तलाव पुर्ण क्षमतेने भरून घेण्यात यावा. वरकुटे तलाव, वाघाळा तलावही पाण्याने भरून द्यावेत. निरा व भिमा नदीवरील सर्व बंधाºयांची सर्व ढापे टाकून पुर्ण क्षमतेने बंधारे पाण्याने भरून द्यावेत. निरा डावा कालव्याचे फाटा नं. 59 ते 36 पर्यंतच्या शेतीला सध्याच्या दुष्काळी परिस्थिती तातडीने आवर्तन सोडावे अशा विविध मागण्यांसाठी पळसदेव येथे गुरूवारी (दि. 20) रोजी राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलत करण्यात येणार असल्याची माहिती माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली.इंदापूर तालुक्यातील शेतीची अवस्था सध्या पावसाळा असूनही उन्हाळ्यापेक्षा दयनीय झाली आहे. सर्व धरणांमध्ये पाणी असतानाही इंदापूर तालुक्यातील शेतीला गेली 4 वर्षांमध्ये मिळत नसल्याने शेतीचे व शेतकºयांचे मोठे नुकसान झाले आहे. जर आता शेतकरी जागृत झाला नाही तर मात्र तालुक्याची पाण्याची वहिवाट कायमची बंद होण्याचा धोका निर्माण झाला आहे.पावसाअभावी दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली आहे.भाटघर धरण तीन वेळा पुर्ण क्षमतेने भरले तसेच खडकवासला व इतर सर्व धरणेदेखिल पुर्ण क्षमतेने भरलेली असतानाही इंदापूर तालुक्याला सध्या शेतीसाठी पाणी दिले जात नाही.इंदापूर तालुक्यातील शेतीला खडकवासला कालव्यातून गेल्या 4 वर्षात पाणी हे मिळालेच नाही. तसेच सणसर कट मधून गेली 4 वर्षे 3.2 टिएमसी पाण्याचा एक थेंबही मिळालेला नाही. जनावरांसाठी चारा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
पाटबंधारेच्या चालढक लीमुळे संताप
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2018 2:15 AM