शहरं
Join us  
Trending Stories
1
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
2
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
3
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
5
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
6
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
7
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos
8
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं चॅटिंग मजेशीर करणाऱ्या 'या' सीक्रेट ट्रिक्स माहितीहेत का?
9
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
10
पाकिस्तानात शी जिनपिंग यांना चीनी सैन्य का करायचे आहेत तैनात?; भारतासाठी चिंताजनक
11
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
12
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
13
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
14
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
15
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
16
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
17
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
18
Maharashtra Election 2024 Live Updates: भिवंडीतील राज ठाकरेंची सभा झाली, पण भाषण झाले नाही
19
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
20
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई

आरक्षणाला पुण्यातून चांगलाच पाठिंबा; शहरात बंद, उपोषण, मोर्चा याबरोबरच कँडल मार्च

By श्रीकिशन काळे | Published: October 31, 2023 1:51 PM

एक मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजीही करण्यात आली...

पुणे :मराठा आरक्षणाला पुण्यात चांगला पाठिंबा मिळत असून, आज नवले ब्रीजजवळ महामार्गावर टायर जाळण्यात आला. त्यामुळे तिथे काही तणावाचे वातावरण होते. तिथे एक मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजीही करण्यात आली. तसेच शहरात बावधनमध्ये बंद पुकारण्यात आला असून, ठिकठिकाणी साखळी उपोषण करण्यात येत आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील उपोषण करत आहेत. त्यांच्या उपोषणाला राज्यभरातून प्रतिसाद मिळत आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये साखळी उपोषण केले जात असून, कँडल मार्च देखील काढले जात आहेत. बीड जिल्ह्यात काही ठिकाणी जाळपोळ झाल्याने आंदोलनाला हिंसक वळण लागत असल्याने त्यावर जरांगे पाटील यांनी सर्वांनी शांत राहावे असे आवाहन केले आहे. जांभुळवाडी गावामध्ये देखील ग्रामस्थांनी एकत्र येऊन या आरक्षणाला पाठिंबा दिला आहे. एक मराठा लाख मराठा अशा घोषणाही या वेळी देण्यात आल्या. तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातही साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे.

जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ कोंढवा भागातील मुस्लिम समाजाच्या वतीने जाहीर पाठिंबा व लाक्षणिक उपोषण आज सकाळी १० वाजल्यापासून सुरू केले आहे. नरवीर तानाजी मालुसरे चौक, कोंढवा खुर्द येथे हे उपोषण होत आहे. दि मुस्लिम फांउडेशन, कोंढवा खुर्द, छत्रपती शिवाजी महाराजांचा मुस्लिम मावळा आणि माजी नगरसेवक ॲड. हाजी गफुर पठाण यांनी हे उपोषण सुरू केले आहे.

शिवणे परिसरात आज मशाल मोर्चासकल मराठा समाजातर्फे मंगळवारी सायंकाळी ६.३० वाजता मशाल मोर्चा आयोजिल आहे. हा मोर्चा अहिरे गेट ते छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, न्यू कोपरे येथून सुरू होईल.

आज कर्वेनगरात कँडल मार्चसकल मराठा समाज, कर्वेनगरच्या वतीने आज मंगळवारी (दि.३१) सायंकाळी ५.३० वाजता कँडल मार्च काढण्यात येणार आहे. हा मार्च डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक (वारजे) कॅनॉल रोड मार्गे विकास चौक-मावळे आळी चौक(मुख्य रस्ता)मार्ग विठ्ठल मंदिर राजाराम पुलाजवळ समाप्त होईल.  

मंडई बंद ठेवणारमहात्मा फुले मंडईतील व्यापाऱ्यांनी बुधवारी (दि.१) संपूर्णपणे बंद पुकारला आहे. तशा आशयाचा फलक सोमवारपासूनच मंडईमध्ये लावण्यात आला होता, जेणेकरून लोकांची गैरसोय होणार नाही.

वकिलांचा उद्या मशाल मोर्चामराठा आरक्षणाच्या मागणीसाठी व जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी शहरातील वकिलांनी भव्य मशाल मोर्चा आयोजिला आहे. हा मोर्चा १ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळा (एसएसपीएमएस कॉलेज) येथून सुरू होणार आहे. शिवाजी पुतळा ते महाराणी जिजाऊ पुतळा लाल महाल येथपर्यंत हा मोर्चा असणार आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षण