इंदापूर : विरोधी पक्षनेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सायबर पोलीस ठाणे बांद्रा मुंबई यांनी कलम १६० अन्वये बजावलेली नोटीस ही बेकायदा आहे. पाच वर्षे स्वच्छ कारभार करणारे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पाठीवर वार करणार्या सरकारच डोक ठीकाणावर आहे का? असा सवाल भाजपनेते हर्षवर्धन पाटील यांनी उपस्थित केला आहे.
इंदापूर तालुक्यात भाजपच्या वतीने माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे नेतृत्वाखाली माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नोटीस दिल्याच्या निषेधार्थ रविवारी सकाळी इंदापूर पोलीस स्टेशन समोर आंदोलन करण्यात आले. त्याप्रसंगी हर्षवर्धन पाटील बोलत होते.
पाटील म्हणाले, आघाडी सरकारमधील नेत्यांना आपले पितळ उघडे पडण्याची भिती वाटत आहे. म्ह्णून भारतीय जनता पार्टीमधील नेत्यांच्या विरोधात सडबुद्धीचे राजकारण सुरू आहे. राज्यातील भाजप नेत्यांना अशा प्रकारे क्रुरनितीने अडकवण्याचा प्रयत्न केल्यास इंदापूर तालुका भाजपच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल. महाविकास आघाडी सरकारमधील अनेक मंत्री व नेत्यांचे बरेच घोटाळे उघडकीस येत आहेत. म्हणून भाजप नेत्यांना नामोहरम करण्याच्या उद्देशाने महाविकास आघाडी सरकारचे सुडबुद्धीचे राजकारण सरू आहे. ज्यांनी घोटाळे उघडकीस आणले त्यांनांच दोषी असल्यासारखे चौकशीला बोलावणे म्हणजे चोर सोडुन सन्याशाला मार अशी गत झाली आहे. गलिच्छ राजकारण करणार्या महाविकास आघाडी सरकारचा हर्षवर्धन पाटील यांनी जाहिर निषेध नोंदवला.