राज्यमंत्री दत्ता भरणे यांच्या प्रयत्नामुळे इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी मंजूर उजनी जलाशयामध्ये येणारे पाण्यापैकी ५ टिएमसी सांडपाणी रद्द केल्याच्या निर्णयाचे तीव्र पडसाद वालचंदनगरमध्ये उमटले. आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने वालचंदनगर बस स्टँड समोर जिल्हा परीषद सदस्य प्रताप पाटील यांच्या मार्गदर्शनाने असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत कोरोना काळातील सोशल डिस्टंसिंग पाळून बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले. यावेळी रविराज खरात, ग्रामपंचायत सदस्य अरूण वीर यांनी तीव्र शब्दांत आपले मत व्यक्त केले.
इंदापूर हा सुप्रिया सुळे यांचा हक्काचा मतदारसंघ असल्याने सुप्रिया सुळे यांना विनंती आहे की, त्यांनी लक्ष घालून शरद पवारांना या निर्णयाचा फेरविचार करून इंदापूरच्या शेतकरी वर्गाला न्याय मिळवून द्यावा असे रविराज खरात यांनी मत व्यक्त केले. जर इंदापूर तालुक्यातील शेतकरी वर्गाला हक्काचे पाणी न मिळाल्यास यापुढे अतितीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य अंबादास शेळके, पोपट मिसाळ, नवनाथ धांडोरे, रोहित झेंडे, महेश बोंद्रे, राजू खोमणे, जमीर कांबळे, अभिजित पवार, लक्षमण चांदणे मुख्तार शेख, भैयासाहेब सोनवणे तसेच सांस्कृतिक सेल अध्यक्ष सचिन रणपिसे, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.