पुणे : पुण्यात बेकायदा बाईक टॅक्सीविरोधात बघतोय रिक्षावाला संघटनेचे आंदोलन सुरू आहे. शहरात ठिकठिकाणी रिक्षा चालकांनी रस्त्यावर आंदोलन सुरू केले आहे. यामुळे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जॅम झाले आहे. जोपर्यंत रॅपिडो बाईक टॅक्सी बंद करण्यात येत नाही तोपर्यंत आमचे आंदोलन सुरूच असेल, असं या रिक्षा चालकांच्या संघटनेकडून सांगण्यात आले आहे.
शहरातील ओला आणि उबेर बाईक टॅक्सीवर प्रशासनाने कारवाई केली आहे. या दोन्ही कंपनीची शहरातील बाईक टॅक्सी बंद करण्यात आली आहे. आता रॅपिडो कंपनीची बाईक टॅक्सीही बंद करण्याची मागणी रिक्षा चालकांनी उचलून धरली आहे.
रॅपिडो बाईक टॅक्सी जोपर्यंत बंद होत नाही. तोपर्यंत आम्ही आंदोलनातून माघार घेणार नाही. जर ओला, उबेरची बाईक टॅक्सी बंद झाली आहे तर रॅपिडोची का बंद होत नाही? शासनाने लवकरात लवकर रॅपिडोवर कारवाई करावी अशी आमची मागणी आहे
- केशव क्षीरसागर (अध्यक्ष, बघतोय रिक्षावाला संघटना, पुणे)