ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्याबाबत दि. १५ फेब्रुवारी रोजी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जालिंदर पठारे यांच्या दालनात बैठक झाली होती. शासन अधिसूचनेप्रमाणे कर्मचाऱ्यांच्या मागण्या असून अंमलबाजवणी व्हावी अशी मागणी आहे.
अतिशय तुटपुंज्या पगारावर ग्रामपंचायत कर्मचारी वर्ग काम करत आहेत. त्यांचे पगार वेळेवर व्हावे, कर्मचारी यांचे अपघाती विमा काढला जात नाही तसेच सेवापुस्तक अद्ययावत केले जात नाही, पाणीपुरवठा कर्मचारी यांना त्यांच्या सुरक्षेसाठी साहित्य दिले जात नाही, राहणीमान भत्ता, शासन नियमाप्रमाणे किमान वेतन दिले जात नाही अशा अनेक अडचणी आहेत. त्या जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत काम बंद आंदोलन सुरूच राहणार आहे, असे प्रदीप पडवळ यांनी सांगितले.
ग्रामपंचायत युनियनचे उपाध्यक्ष रामदास इंदोरे, सचिव कैलास टाव्हरे, महिला अध्यक्ष अर्चना गावडे, उपाध्यक्ष विजया भोर, सचिव रेश्मा आदक, सुरेश भोर, अनिल भोर, संदीप मनकर, संगीता हिंगे, किसन भोजने, शांताराम साबळे, अविनाश वाघ, बजरंग वंजारी, गीता राक्षे, गीतांजली पंधारे,सुजाता हिंगे, दशरथ बोऱ्हाडे यांच्या नेतृत्वाखालील काम बंद आंदोलन करणार आहे. याबाबत तहसीलदार रमा जोशी, गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, घोडेगावचे सहायक पोलिस निरीक्षक प्रदीप पवार यांना निवेदन देण्यात आली आहे.