यावेळी पुणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते, मुख्य ज्ञान अधिकारी अनिरुध्द शहापुरे, व कंपनी सेक्रेटरी स्वानंद शेंडे आणि इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिलनचे पुणे चेप्टरचे अध्यक्ष जे. पी. श्रॉफ हे उपस्थित होते. तसेच ऑनलाईन पध्दतीने इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिलनचे अध्यक्ष व्ही. सुरेश, पुणे चॅप्टरच्या सह-अध्यक्ष डॉ. पूर्वा केसकर, सीआयआय पुणे विभाग अध्यक्ष दीपक गर्ग उपस्थित होते.
यावेळी डॉ. कोलते, म्हणाले, आयजीबीसी यांच्या सहकार्याने शहरातील शहरी हरित इमारतीवरील उपक्रमांवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. सर्वोत्तम पद्धती आणि शहरातील हरित वैशिष्ट्यांमध्ये वाढ करण्यासाठी, वहन विकास, जलसंधारण आणि पर्यावरणीय संवेदनशील विभाग यांसारख्या प्रमुख बाबींविषयी काम केले जाणार आहे. आभार प्रणिती श्रॉफ यांनी मानले.