राजगुरुनगर - खेड तालुक्यात कृषी पर्यटनाला चालना देण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. त्यासाठी पीक पद्धतीत बदल करून आधुनिकतेची जोड मिळाली तर सकारात्मक भूमिका शेतकरीच बदलू शकतो, असे मत आमदार सुरेश गोरे यांनी व्यक्त केले.चांडोली (ता. खेड) येथील जिल्हा फळरोपवाटिकेत कृषी विभागाच्या वतीने कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), ग्रामस्वराज्य अभियान आयोजित किसान कल्याण कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी आमदार गोरे बोलत होते.याप्रसंगी प्रांताधिकरी आयुष प्रसाद, कृषी उपविभागीय अधिकारी संगीता माने, तालुका कृषी अधिकारी अॅड. लक्ष्मण होटकर, पंचायत समिती कृषी अधिकारी मनोज कोल्हे, मंडल अधिकारी नरेंद्र वेताळ, आर. बी. बारवे, शेतकरी सेना तालुकप्रमुख एल. बी. तनपुरे, संभाजी कुडेकर, बाळासाहेब खैरे आदींसह शेतकरी आणि कृषी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.गोरे म्हणाले, की पीक पद्धतीत बदल करून सकारात्मक भूमिकेत शेती करणे काळाची गरज आहे. आज शेतकरी २४ तास शेतीत राबत आहे. मात्र, या बेभरवासाचा कारखाना चालवताना अनेक अडचणीवर मात करून आपली उपजीविका चालवताना कर्जबाजारी होत असल्याने नकारात्मक भुमिका तयार होत आहे. या शेतीला जोड व्यवसायाशिवाय पर्याय नाही. तालुक्याची भौगोलिक रचना पहाता पाण्याचे नियोजन करण्यासाठी सिचंन होऊनही बाजारपेठेत शेतीमालाला हमी भाव मिळत नाही तोपर्यंत बळीराजाचे जीवनमान उंचवणार नाही.यावेळी तालुक्यातील शेती क्षेत्रात विविध तंत्रज्ञान वापरुन आधुनिक पद्धतीने शेती पिके घेणाऱ्या आदर्श शेतकरी चितांमण हांडे (धामणगाव खुर्द), दत्तात्रय मोरमारे (टोकावडे), भगवंता शिंदे (रोहकल), बाबूराव पिचड (आंबोली), बाळासाहेब पानसरे (निघोजे), सीताबाई जाधव ( चिबंळी), भाऊ केदारी (दोंदे), कैलासराव ठाकुर (पिपंरी), कैलास डावरे (पिपंरी), दिलीप नाईकडे (कमान), मारुती गडदे (पाईट), रामदास लांडगे, सतीश जैद (बुरसेवाडी) आणि सह्याद्री स्कूलच्या समन्वयक दीपा मोरे यांचा सत्कार करण्यात आला.या एकदिवशीय कार्यशाळेतील तालुक्यातील उपस्थित शेतकºयांना शैलेंद्र घाडगे, डॉ. सलिम शेख, श्री कुºहाडे पाटील, धनेश पडवळ, दीपा मोरे यांनी शेतीविषयक विषयावर मार्गदर्शन केले. अनेक शेतकºयांनीदेखील त्यांच्या हलाखीचे वर्णन सांगून लोकप्रतिनिधी व कृषी अधिकारी यांच्याकडून असलेल्या अपेक्षा बेधडकपणे मांडल्या.सूत्रसंचालन मंडल अधिकारी वसंतराव खंडागळे यांनी तर आभार डी. एन. गायकवाड यांनी मानले.सामूहिक शेती पद्धतीची आज काळाची गरज आहे. शेती पिके थेट बाजारपेठेत विक्री करण्यासाठी शेतकºयांनी एकत्र येऊन व्यवस्थापन करून शेती फायदेशीर असूनही आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली पाहिजे.- आयुष प्रसाद, प्रांताधिकारी
कृषी पर्यटनाला चालना देणार - सुरेश गोरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2018 3:11 AM