शेटफळगढे : राज्य शासनाने सुरू केलेल्या ई-पीक पाहणी या योजनेला मदत करण्यासाठी साखर कारखान्याचा शेतकी विभाग मदत करणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्याबाबतच इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी कार्यकारी संचालक यांच्या उपस्थितीत शेतकी विभागाची बैठक घेतली.
यावेळी श्रीकांत पाटील म्हणाले की, शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेतातील पीक पाहणी स्वतः करायची आहे, त्यासाठी मोबाईल अॅप तयार केले आहे. या ॲपची माहिती शेतकी विभागाला दिली तसेच शेतकऱ्यांना मोबाईलद्वारे पीक पाहणी करताना शेतकऱ्यांना ॲप चालविताना काही अडचण येत आहेत ही योजना अधिक गतिमान करण्यासाठी कारखाना कार्यक्षेत्रातील गावोगावी असलेल्या शेतकी विभागाचे कर्मचार्यानी शेतकऱ्यांना मदतीसाठी जाण्याच्या सूचना कारखान्याच्या प्रशासनाला व शेतकी भागाला तहसीलदार यांनी दिल्या.
तहसीलदार पाटील यांनी यावेळी शासनाच्या या महत्वाकांक्षी योजनेची माहिती व महत्त्व सांगितले तसेच याच बरोबर व्यायामाचे व आरोग्याचे महत्त्व ही सांगितले. यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक अशोक जाधव यांनीही कारखाना प्रशासनाच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
बैठकीला कारखान्याचे संचालक रणजीत निंबाळकर, शेतकी अधिकारी जालिंदर शिंदे, ऊस विकास अधिकारी प्रवीण कांबळे, संगणक विभाग प्रमुख कैलास देवकर, महेश काटे, अरुण लोदाडे, रामदास निंबाळकर, रामभाऊ काटे, महेंद्र कदम, दादा बोरकर गुलाबराव भरणे संजय मुळीक यांच्यासह कारखान्याचे अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते.
080921\img_20210908_081324.jpg
पीक पाहणी मोबाईल ॲप्स माहिती देण्यासाठी छत्रपती सहकारी साखर कारखान्यावर आयोजित बैठकीत कारखान्याच्या वतीने तहसीलदार श्रीकांत पाटील यांचा सत्कार करण्यात आला