पुणे: आवाज कोणाचा अहमदनगरचा करंडक कोणाचा अहमदनगरचा, एम एच सोळा आता नादच खुळा अशा घोषणा देत पुरुषोत्तम महाकरंडकावर पुन्हा अहमदनगरच्या न्यू आर्टस् सायन्स, कॉमर्स महाविद्यालयाने आपले स्थान निश्चित ठेवले आहे.
महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित पुरुषोत्तम महाकरंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा पार पडला. यावेळी अहमदनगर येथील न्यू आर्टस् सायन्स , कॉमर्स महाविद्यालयाने सांघिक प्रथम पुरुषोत्तम महाकरंडक माईक या एकांकिकेने मिळवला असून सांघिक द्वितीय चिंतामणराव व्यापार महाविद्यालय सांगली यांच्या देवभाबळी, सांघिक तृतीय मॉडर्न अभियांत्रिकी पुणे यांच्या ए एस एल प्लिज, तर सर्वोत्कृष्ट प्रायोगिक करंडक पु.ओ. नाहाटा वाणिज्य महाविद्यालय जळगाव यांच्या एक्स या एकांकिकेने मिळवला आहे.
यावेळी मराठे ज्वेलर्स चे मिलिंद मराठे, खान्देश शिक्षण संस्थेचे सेक्रेटरी शशिकांत बडोदकर, परीक्षक अभिनेते विद्याधर जोशी, दिग्दर्शक अस्विनी गिरी, अभिनेते बाळकृष्ण दामले, गृहप्रकल्प वास्तुविशारद अविनाश रावते महाराष्ट्रीय कलोपासक अध्यक्ष अनंत निकोजकर, राजेंद्र ठाकूर देसाई, आदी उपस्थित होते.