डमी स्टार 770
गाडीची बॅटरी उतरू नये म्हणून रोज गाड्या 15 ते 20 मिनिटे चालू , तर स्थानकाच्या आवारात फेरफटका
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : लॉकडाऊनमुळे जवळपास दीड महिन्याहून अधिक काळ राज्य परिवहन महामंडळाच्या जवळपास सर्वच गाड्या ह्या जागेवर थांबून आहेत. पुणे विभागाच्या जवळपास शंभरहून अधिक गाड्या ह्या नादुरुस्त आहेत. काही गाड्यांतील वातानुकूलित यंत्रणा बंद आहे, तर काही गाड्यांचे इंजीनचे कामे निघाली आहेत. त्यामुळे आता एसटीला देखभाल-दुरुस्तीवर मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागणार आहे.
जवळपास दीड महिन्याहून अधिक काळ एसटी बसेस बस स्थानकाच्या आवारात थांबून आहेत. या गाड्याच्या बॅटरी डाऊन होऊ नये, तसेच ते इंजीनचे काम काढू नये म्हणून ह्या गाड्यांना रोज किमान 20 ते 30 मिनिटांसाठी सुरू करून ठेवाव्या लागत. तर काही गाड्यांना 1 ते 2 किमी फिरवून आणावे लागत.परिणामी यावर जवळपास 20 ते 25 हजार लिटर डिझेल खर्ची पडलं आहे. एसटी ने गाड्या खराब होऊ नये म्हणून काळजी घेतली ,खरी मात्र विविध कारणांमुळे 100 हुन अधिक गाड्या या काळात नादुरुस्त झाल्या आहेत.
राज्य परिवहन महामंडळाची प्रवासी सेवा मोठ्या प्रमाणात बाधित झाली असल्याने एसटीला रोज 22 कोटींचा फटका बसत आहे. एकीकडे प्रवासी उत्पन्न बुडले असताना दुसरीकडे गाड्यांवर मोठा खर्च होऊ नये म्हणून रोज डिझेलवर पैसा खर्च करावा लागत आहे. रिकाम्या गाड्यांवर आतापर्यंत पुणे विभागात 25 हजार डिझेलचा वापर झाला आहे.
बॉक्स 1
देखभाल-दुरुस्तीचा खर्च वाढणार :
राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात जवळपास 18 हजार गाड्या आहेत. त्याच्यावर देखभाल-दुरुस्ती करीत महिन्याला 20 ते 22 कोटी रुपयांचा खर्च होतो. आता गाड्या दीड महिन्यापासून बंद असल्याने या खर्चात जवळपास 10 ते 15 टक्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. यातील अनेक गाड्यांचे आयुर्मान देखील संपत आल्याने त्यावर होणार खर्च देखील जास्त असणार आहे.
कोट 1
सामान्य प्रवासी सेवा बंद असल्याने आम्ही रोज गाड्या सुरू करून ठेवत.तसेच यांत्रिक विभागाचे कर्मचारी प्रत्येक गाडीचा देखभाल-दुरुस्ती करीत.त्यामुळे गाड्या सुरू करण्यास फारशी अडचण येणार नाही.
ज्ञानेश्वर रणवरे ,विभागीय वाहतूक अधिकारी, पुणे विभाग.
पुणे विभाग
एकूण आगार 13 ,
एकूण गाड्या : 998