शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

येत्या वर्षभरात पुणे शहरातल्या लाख घरांपर्यंत वायू वाहिनी पोहोचवणार: खासदार गिरीश बापट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 12:07 PM

'एमएनजीएल' ला पंंधरा वर्षे पूर्ण

ठळक मुद्देएमएनजीएलमुळे शहरातील प्रदूषणाची पातळी कमी करण्यात मोठे यश

पुणे : येत्या वर्षभरात शहरातल्या एक लाख घरांपर्यंत नैसर्गिक वायू वाहिनी पोहोचवणार आहे. यासाठी येणाऱ्या तांत्रिक अडचणी आणि इतर परवान्यांमधल्या समस्या सोडवल्या जातील, अशी माहिती पुण्याचे भाजप खासदार गिरीश बापट यांनी दिली.

महाराष्ट्र नँचरल गँस लिमीटेड (एमएनजीएल)ला पंधरा वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आयोजित पत्रकार परिषदेत बापट बुधवारी (दि. १३) बोलत होते. एमएनजीएलचे संचालक राजेश पांडे, कार्यकारी संचालक एस. हलदार, वाणिज्य संचालक संतोष सोनटक्के यावेळी उपस्थित होते.

बापट म्हणाले की, एमएनजीएलच्या माध्यमातून शहरातील प्रदूषणाची पातळी कमी करण्यात मोठे यश आले आहे. शहरातील सार्वजनिक बस सेवेच्या सुमारे दीड हजार गाड्या तर पन्नास हजार रिक्षा आता पारंपरिक इंधनाऐवजी नैसर्गिक वायू वापरतात. भविष्यात हे प्रमाण वाढवण्याचा प्रयत्न आहे. कोरोना काळात 'एमएनजीएल'ने सीएसआरमधून दिलेल्या निधीमधून रिक्षाचालकांना रोख रकमेची तसेच अनेक गरजूंना आवश्यक मदत करता आली, असेही त्यांनी सांगितले.

पांडे यांनी सांगितले की, नाशिक, धुळे, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्येही आता एमएनजीएलचे काम सुरु होणार आहे. या नव्या भागातील रिक्षा चालकांना 'गॅस कीट'साठी मदत केली जाणार आहे. एका गँस कीटला तीस हजार रुपये खर्च आहे. यावरील व्याज 'एमएनजीएल' भरणार आहे. सीएनजीवर धावणाऱ्या रिक्षाला प्रति किलोमीटर १ रुपये तीस पैसे खर्च येतो तर डिझेलवरील रिक्षाचा खर्च किलोमीटरला ३ रुपये वीस पैसे आहे. शिवाय यातून वायू प्रदूषणही थांबते. .. पाचशे रुपयात कनेक्शनएका कनेक्शनसाठी सहा हजार रुपये तर एका घरापर्यंत कनेक्शन पोहोचवण्यासाठी एमएनजीएलला पंधरा हजार रुपये खर्च येतो. या पार्श्वभूमीवर केवळ पाचशे रुपयात कनेक्शन देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. मोठ्या सोसायट्यांनी एकदम नोंदणी केल्यास सवलत देण्याचाही विचार करता येईल.- राजेश पांडे. ...  'एमएनजीएल' देशात चौथीदर दिवशी १० लाख क्युबीक मीटर वायूचा पुरवठा एमएनजीएलतर्फे सध्या केला जातो. नैसर्गिक वायू क्षेत्रात देशात असणाऱ्या चाळीस कंपन्यांमध्ये एमएनजीएल चौथ्या क्रमाकांवर आहे. पुण्यात ३ लाखांपेक्षा जास्त घरगुती जोडण्या देण्यात आल्या आहेत. तर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेततल्या सतराशे गाड्या नैसर्गिक वायू वापरतात. शिवाय, चाकण तळेगाव औद्योगिक वसाहतीमधल्या २२० उद्योगांनाही वायू पुरवठा केला जातो.

टॅग्स :Puneपुणेgirish bapatगिरीष बापटpollutionप्रदूषण