शहरं
Join us  
Trending Stories
1
CM शिंदेंनी शिवसेनेचा पहिला उमेदवार केला जाहीर, जयस्वालांना 'या' मतदारसंघातून तिकीट
2
Shubham Lonkar: अकोल्याचा शुभम वर्षभरापासून लॉरेन्स टोळीच्या संपर्कात
3
भुजबळ-जरांगे समर्थक आमने-सामने; महामार्गावरील वाहतूक रोखली, येवल्यात तणाव!
4
Ind vs Aus Women: भारताच्या आशा मावळल्या! ऑस्ट्रेलियाने 9 धावांनी केला पराभव
5
पुण्यात काँग्रेसमध्ये तिकिटासाठी गर्दी! २१ विधानसभा मतदारसंघासाठी झाल्या मुलाखती
6
छातीत कळ आली अन्...; नांदेडमध्ये 'लाडकी बहीण' कार्यक्रमाला आलेल्या महिलेचा मृत्यू
7
मोठी बातमी! बाबा सिद्धिकी हत्या प्रकरणात पुण्यातून एकाला अटक, आरोपी कोण?
8
Baba Siddique : 'ती' पोस्ट करणारा अकोल्याचा शुभम लोणकर भावासह फरार, पोलिसांकडून शोध
9
बाबा सिद्दिकींच्या हत्येमागे 'रिअल इस्टेट' कनेक्शन?; केआरकेच्या पोस्टमुळे नवी चर्चा
10
Baba Siddique यांना खरंच वाय दर्जाची सुरक्षा होती का? अखेर उत्तर मिळालं
11
बाबा सिद्दिकी हत्याकांडातील चौथ्या आरोपीची ओळख पटली; पोलीस जसीन अख्तरच्या मागावर
12
नाशिकमध्ये अग्निवीरांचा मृत्यू; राहुल गांधींचे पंतप्रधान मोदी-राजनाथ सिंहांना तीन सवाल
13
'महाराष्ट्र राजकीय परिवर्तनासाठी सज्ज', विधानसभा निवडणुकीबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
14
१६ ऑक्टोबरला नवीन पल्सर लाँच होणार? पहिल्या सीएनजी बाईकला टक्कर देणार!
15
चांदीने १ लाखाचा टप्पा केला पार; जाणून घ्या कोणत्या शहरात किती दर?
16
बाबा सिद्दिकी हत्या : एका आरोपीला पोलीस कोठडी, तर दुसऱ्याला..., न्यायालयाचा आदेश काय?
17
बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी केली फेसबुक पोस्ट; पोलिस घरी पोहोचले, त्याआधीच शुभम झाला गायब
18
Baba Siddique : "२०१९ ला जेलमध्ये गेला, जामीन कसा मिळाला माहीत नाही; ११ वर्षांपूर्वीच घरातून हाकलून दिलं"
19
"उद्धव ठाकरे, सारखं वाघनखं काढतंय; एकनाथ शिंदे, ते एक पुष्पा वेगळंच"; राज ठाकरे बरसले
20
"मी तुमचा चित्रपट बनवेन - एक था MLA", दाऊद इब्राहिमनं एकदा बाबा सिद्दिकींना दिली होती धमकी

३६ हजार फुटांवर विमानात बिघाड; पुण्याच्या मैत्रेयीने वाचविले १४० प्रवाशांचे प्राण, जगभरातून कौतुकाचा वर्षाव

By श्रीकिशन काळे | Published: October 13, 2024 6:56 PM

हायड्रॉलिक सिस्टिममध्ये बिघाड झाल्यानंतर धावपट्टीचा अंदाज लावून विमान सुरक्षितरीत्या उतरवलं अन् १४० प्रवाशांचा जीवात जीव आला

पुणे: जमिनीपासून ३६ हजार फूट उंचीवर असणाऱ्या विमानामध्ये बिघाड झाला आणि सर्व प्रवाशांच्या हृदयाची धडधड अधिकच वाढली. आता आपण काही वाचणार नाही, अशीच अवस्था सर्वांची झाली असणार ! पण त्यामध्ये पुण्याच्या सहवैमानिक असणाऱ्या मैयेयी शितोळे हिने अतिशय धीराने सर्व परिस्थिती हाताळली आणि विमानातील बिघाड दुरुस्त केला. त्यामुळे विमानातील तब्बल १४० प्रवाशांचे प्राण वाचले. या पुणेकर मुलीचे जगभर कौतुक होत आहे.

एअर इंडियाचे एक विमान शुक्रवारी (दि.११) सायंकाळी त्रिचीहून शारजाहला जात होते. तमिळनाडूच्या त्रिची एअरपोर्टवर नेहमीप्रमाणे गजबज होती. प्रवाशी ये-जा करत होते, पण अचानक विमानात बिघाड झाल्याचे समजताच सर्वत्र धावपळ सुरू झाली. एअर इंडियाचे ‘फ्लाइट आयएक्स ६१३’ या विमानात तब्बल ३६ हजार फूट उंचीवर बिघाड झाला होता. एक-दोन नव्हे तर तब्बल १४० प्रवाशांचा जीव त्यामुळे धोक्यात होता. विमानातील हायड्रॉलिक सिस्टिममध्ये अचानक बिघाड झाला आणि ते निकामी झाले. त्यामुळे वैमानिकांना चांगलीच कसरत करावी लागली. हायड्रॉलिक सिस्टिममध्ये बिघाड झाल्याचे समजल्यानंतर विमानतळावर आणखीनच गोंधळ उडाला. त्यामुळे अधिकाऱ्यांनी विमानतळावर एमर्जन्सीची घोषणा केली. तातडीने सुरक्षेसाठी विमानतळावर २०हून अधिक रूग्णवाहिका आणि अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. एअर इंडिया फ्लाइटचे पायलट क्रोम रिफादली फहमी झैनाल आणि सहवैमानिक मैत्रेयी शितोळे यांच्यासाठी ही परिस्थिती अतिशय गंभीर होती. त्यांची कसोटी पाहणारी होती. त्या दोघांनी विमानाला सुरक्षित खाली उतरवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले आणि अखेर धावपट्टीचा अंदाज लावून विमान सुरक्षितरीत्या उतरवलं. तेव्हा १४० विमान प्रवाशांचा जीवात जीव आला. यामध्ये पुण्याची सहवैमानिक मैत्रेयी शितोळे हिचे मोठे योगदान ठरले.

एअर नेव्हिगेशनमध्ये प्राविण्य

मैत्रेयी ही एअर इंडियामध्ये सहवैमानिक म्हणून गेल्या चार-पाच वर्षांपासून काम करते. मैत्रेयीने न्यूझीलंडमधील मेनलँड एव्हिएशन कॉलेज, ड्युनेडिन येथे वैमानिकचे प्रशिक्षण घेतले. तिथेच तिने व्यावसायिक पायलट म्हणून काम सुरू केले. त्यानंतर मात्र मैत्रेयीने भारतात येऊन नोव्हेंबर २०१९ पासून ग्राऊंड इन्स्ट्रक्टर म्हणून काम करण्याचा निर्णय घेतला. एअर नेव्हिगेशन, तांत्रिक, उड्डाणाच्या इथिकल गोष्टी यामध्ये मैत्रेयीने प्राविण्य मिळवले आहे. मैत्रेयीने वैमानिक होण्याआधी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची फिजिक्समधील डिग्री संपादन केली आहे.

प्रेशरखाली काम करण्याचे कौशल्य !

मैत्रेयीने तणावाखाली काम करण्याचे खास प्रशिक्षण घेतले आहे. तसेच डेडलाइनच्या अगोदर काम करण्याचे कौशल्यदेखील तिने आत्मसात केलेले असून, प्रशासकीय आणि संगणकीय कामातही ती निपुण आहे.

नेमकं घडलं काय ? 

विमानामध्ये हायड्रोलिक सिस्टिममध्ये बिघाड झालेला. यामुळे विमान संचलन करताना इतर यंत्रणेमध्ये बिघाड होऊ शकतो, तसेच अनेक अडचणी येतात. म्हणून वैमानिकांनी विमान टेक आॅफ केल्यानंतर तिथेच लॅंडिंग केले. पण लॅन्डिंग करताना काही प्रोटोकाॅल असतात. विमान लॅंन्डिंग करताना त्यातील इंधन कमी झालेले असते. पण हे विमान इंधनाने पूर्ण लोडेड होते. त्यामुळे ते इंधन कमी केल्याशिवाय लॅंन्ड करता येत नव्हते. म्हणून विमानाने काही काळ घिरट्या मारून इंधन कमी केले. त्यानंतर लॅंन्डिंग करण्यात आले, अशी माहिती वैमानिक सेवा सल्लागार धैर्यशिल वंडेकर यांनी 'लोकमत'ला दिली.

टॅग्स :PuneपुणेairplaneविमानWomenमहिलाSocialसामाजिकpassengerप्रवासीNatureनिसर्ग