VIDEO | बारीक व्हा ! बारीक व्हा ! अजित दादांचा पोलिस उपायुक्तांना सल्ला…

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2022 03:34 PM2022-06-03T15:34:45+5:302022-06-03T15:48:33+5:30

अजित दादांचा पोलिस उपायुक्तांना पोट कमी करण्याचा सल्ला...

Ajit Dada advises Deputy Commissioner of Police dr kakasaheb dole to lose weight | VIDEO | बारीक व्हा ! बारीक व्हा ! अजित दादांचा पोलिस उपायुक्तांना सल्ला…

VIDEO | बारीक व्हा ! बारीक व्हा ! अजित दादांचा पोलिस उपायुक्तांना सल्ला…

googlenewsNext

पुणेराज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या बेधडक स्वभावाने महाराष्ट्राला परिचित आहेत. याचा अनुभव आज पिंपरी चिंचवडमध्ये एका कार्यक्रमात आला. झालं असं की, पिंपरी चिंचवड क्षेत्रात पोलिस पेट्रोलिंगकरिता स्मार्ट बाईक मोटार सायकल्स हस्तांतरण करण्याचा आज कार्यक्रम होता. यावेळी गाडीची चावी घेताना पोलिस उपायुक्त डॉ. काकासाहेब डोळे यांना पोट कमी करून बारीक होण्याचा सल्ला दादांनी दिलाय. यावेळी तिथे पोलिस आयुक्त अंकुश शिंदे उपस्थित होते.

यावेळी , ग्रीन मार्शल पथकाकरिता ई-चलन उपकराणाचे वाटप तसेच अग्निशमन दूचाकी वाहनांचे लोकार्पणदेखील करण्यात आले. कार्यक्रमाला महानगरपालिका आयुक्त राजेश पाटील, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, अतिरिक्त पोलिस आयुक्त संजय शिंदे, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे आदी उपस्थित होते.

पिंपरी चिंचवड क्षेत्रात पोलिस पेट्रोलिंगकरिता ५० स्मार्ट मोटारसायकल्सचे हस्तांतरण

शहरामधील वाहतूक कोंडी, गुन्हेगारी व चोऱ्या यांचे पोलिस पथकामार्फत पेट्रोलिंग करण्याकरिता स्मार्ट मोटारसायकल्सचा वापर करण्यात येणार आहे. पोलिस विभागाला कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यासाठी या दुचाकी वाहनांची मदत होणार आहे.

अग्निशामक मोटार सायकल्सचे हस्तांतरण

पिंपरी चिंचवड कार्यक्षेत्रातील अरूंद रस्ते, गल्लीबोळ, मार्केट परिसर, इत्यादी ठिकाणी आग विझविण्यासाठी अग्निशामक जवानास तातडीने व सहजपणे पोहचण्यास या वाहनांमुळे मदत होणार आहे. या वाहनात २०+२० लीटर क्षमतेच्या २ पाण्याच्या टाक्या आहेत. घटनास्थळी तातडीने पोहोचण्यासाठी रस्त्यावरील वाहतूक बाजूला करण्यासाठीदेखील वाहनांची मदत होणार आहे.

ग्रीन मार्शल पथकाकरिता ई-चलन उपकरणचे वितरण
हे अँड्रॉइड प्रणाली आधारित यंत्र असून डिजिटल पावती,डिजिटल पेमेंट, वाहतूक विभागाच्या वाहन प्रणालीशी सुसंगत आहे. या उपकरणाच्या वापरामुळे दंडाची रक्कम जागेवर प्राप्त होऊन त्याची पावती नागरिकास देण्यात येणार आहे. या उपकरणाचा वापर करणे महापालिकेस सुलभ ठरणार असून कारवाईमध्ये अधिक पारदर्शकता येणार आहे

Web Title: Ajit Dada advises Deputy Commissioner of Police dr kakasaheb dole to lose weight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.