नोटबंदीमुळे देशाचे झाले वाटोळे - अजित पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 04:24 AM2017-11-28T04:24:30+5:302017-11-28T04:24:41+5:30
सत्तेमध्ये असलेल्या भाजपा सरकारने केलेल्या नोटबंदीमुळे, तसेच नवीन आणलेल्या जीएसटी करप्रणालीमुळे या सरकारने देशाचं वाटोळे केले, असे विधान माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
पिरंगुट : सत्तेमध्ये असलेल्या भाजपा सरकारने केलेल्या नोटबंदीमुळे, तसेच नवीन आणलेल्या जीएसटी करप्रणालीमुळे या सरकारने देशाचं वाटोळे केले, असे विधान माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
मुळशी तालुक्यामधील गडदावणे या ठिकाणी विविध विकासकामांच्या भूमिपूजनासाठी आलेल्या पवार यांनी बोलताना भाजपा सरकारवर तोफ डागली.
ते म्हणाले, ‘‘या भाजपा सरकारने नोटबंदी करून, जीएसटीसारखी करप्रणाली आणून छोट्या-मोठ्या व्यापाºयांसह व सर्वसामान्य नागरिकांसह भल्याभल्यांचे कंबरडे मोडून या देशाचे वाटोळे केले.’’ पवार म्हणाले, ‘‘कॅशलेस व्यवहाराच्या नावाखाली सर्वसामान्य नागरिकांची मोठी अडचण करून संपूर्ण अर्थव्यवस्था अडचणीत आणलेली आहे.’’ सरकारच्या या चुकीच्या निर्णयामुळे व चुकीच्या धोरणामुळे देशाचा विकासदर घटलेला आहे. जि. प. माजी अध्यक्ष सविता दगडे, माजी उपाध्यक्ष शुक्राचार्य वांजळे, माजी गटनेते शांताराम इंगवले, जि. प. सदस्य शंकर मांडेकर, माजी सभापती महादेव कोंढरे, राजेंद्र हगवणे, म. ता. रा. अध्यक्ष सुनील चांदेरे, युवक मुळशी तालुकाध्यक्ष अमित कंदारे, महिलाअध्यक्षा चंदा केदारी, पं. स. सदस्य राधिका कोंढरे, सरपंच अनिता नांगरे, उपसरपंच नीलेश ढमाले, किसन नागरे, सुभाष अमराळे, विलास अमराळे, काका पवळे, हनुमंत नांगरे आदी उपस्थित होते.