जरा कळ सोसा, सारखं मुख्यमंत्री- मुख्यमंत्री करु नका; अजित पवारांनी कार्यकर्त्यांना सुनावलं, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2024 03:54 PM2024-02-11T15:54:12+5:302024-02-11T15:56:56+5:30
आज पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचा युवा मिशन कार्यक्रम पार पडला.
Ajit Pawar ( Marathi News ) : गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस मधील कार्यकर्ते अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा व्यक्त करत आहेत. याबाबत आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्त्यांचे कान टोचले. "जरा कळ सोसा, सारखं सारखं मुख्यमंत्री करु नका, आधी संघटना बांधू ती मजबूत करु, असा सल्ला आजित पवारांनी दिला. आज पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचा युवा मिशन कार्यक्रम पार पडला. यावेळी अजितदादांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
"आता आपल्याला विकासावर लक्ष द्यायचं आहे, महिला धोरण आपण आणलं आहे. काळानुरुप काही बदल करायचे असतात. युवकांसाठी आपण २०१२ मध्ये धोरण आणलं होतं. आपण लोकशाहीत काम करतो. बहुमताला आदर देऊन त्यांना संधी द्यावी लागते, आपल्या जिल्हा अध्यक्षांनी खालच्या पदाधिकाऱ्यांकडून जास्त अपेक्षा ठेऊ नये. आपल्या पक्षात निवड करताना जातीपातीचा विचार केला नाही पाहिजे. आम्ही आमच्या उमेदीच्या काळात नव्या जबाबदाऱ्या स्विकारल्या त्यामुळे आता इथेपर्यंत येऊन पोहोचलो, असंही अजित पवार म्हणाले.
ईडीने कारवाई केलेल्या नेत्यांमध्ये एकही भाजप नेता नाही; शरद पवारांचा हल्लाबोल
"२००४ मध्ये राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाला असता पण त्यावेळी काय झालं आपल्याला माहित आहे. पण आता थोड कळ सोसा लगेच मुख्मंत्री मुख्यमंत्री अस करुन नका. आधी आपण संघटना मजबूत करुया, असंही पवार म्हणाले. आपल्या पक्षात लोक प्रवेश करत आहेत, त्यांना आपला विश्वास वाटत आहे.आपण बेरजेचं राजकारण करायचं आहे. आता फक्त आम्हीच काम करुन चालणार नाही, सर्वांनी काम करायला पाहिजे. आपल्याला बहुजन समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचलं पाहिजे. आपल्या पक्षातील अनेकांच्या समस्या होत्या पण आपले वरिष्ठ काही समजून घेत नव्हते म्हणून हा निर्णय घ्यावा लागला. निर्णय कसे धाडसाने घ्यायचे असतात याची आम्हाला समज आहे, तरुण-तरुणींना त्यांचा रोजगार देता आला पाहिजे. त्याकरता आपण महायुतीमध्ये आपण गेलो आहे. आज देशात नरेंद्र मोदी यांना पर्याय नाही,असंही अजित पवार म्हणाले.
"आपल्या पक्षाचे भवितव्य तुम्ही आहात. आपल्या पक्षाने कायम बहुजनांचा विचार केलेला आहे. आपण कुठल्याही परिस्थितीत कमी पडायचे नाही. आपण सत्तेत गेलो तरीही आपली विचारधारी तिच आहे. विचार बदलेले नाहीत. तुम्हाला आता कोणाचेही फोन येतील तुम्ही लगेच हळवे होऊ नका, मी सगळ्यांना फोन करायला लागलो तर काम कधी करु, मला काम सांगा मी करुन देतो, असंही पवार म्हणाले.