पुणे : 30 वर्ष राजकारणात असलेला माणूस पटकन बाजूला होईल, असे वाटत नाही. अजित पवार यांची धडाडी बघता ते वेगळा निर्णय घेऊ शकतात, असा तर्क भाजपाचे खासदार संजय काकडे यांनी पुण्यात काढला. पुण्यात ते माध्यमांशी बोलत होते. पुढे ते म्हणाले की, काही निर्णय घेतील पण राजकारणातून बाजूला जाणार नाही. राज ठाकरेही मनसेची स्थापना करण्यापूर्वी 7 दिवस नॉट रिचेबल होते याकडेही त्यांनी लक्ष वेधले. महाराष्ट्रात त्यांचे अनेक चाहते आहेत. त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. शरद पवारांना अजित पवार दूर जाणे परवडणारे नाही. त्यांचा स्वभाव मला माहिती आहे, असेही त्यांनी म्हटले.
ईडीच्या चौकशीवर ते म्हणाले की, 'ईडीची चौकशी अनेक वर्षांपासून सुरू आहे. याचा केंद्र आणि राज्य सरकारशी काही संबंध नाही.शरद पवार यांचा उल्लेख कुठेतरी आला असेल त्यामुळे त्यांचा केला असावा. पण या कारणामुळे अजित पवार मला अस्वस्थ असतील असं मला वाटत नाही.मी त्यांना 30 वर्षांपासून आहे. हा गुन्हा त्यांच्यासह 70 व्यक्तींवर दाखल आहे मग त्यांनीही राजीनामा द्यायला पाहिजे. आमचे पूर्वी मैत्रीचे संबंध आहेत. शरद पवार सांगत असलेले कारण खरे वाटत नाही असेही ते म्हणाले.