Ajit Pawar: विधानसभेला लोकसभेसारखा दणका देऊ नका! आम्ही कामाची माणसं आहोत - अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2024 05:57 PM2024-08-18T17:57:22+5:302024-08-18T17:57:39+5:30

घड्याळ, धनुष्यबाण व कमळ यांना पाठिंबा दिला तर लाडकी बहीण योजना चालूच राहणार आहे

Ajit Pawar Don't give the Vidhan Sabha a bang like the Lok Sabha We are people of work - Ajit Pawar | Ajit Pawar: विधानसभेला लोकसभेसारखा दणका देऊ नका! आम्ही कामाची माणसं आहोत - अजित पवार

Ajit Pawar: विधानसभेला लोकसभेसारखा दणका देऊ नका! आम्ही कामाची माणसं आहोत - अजित पवार

मंचर(पुणे): लोकसभेचा (Lok Sabha) निकाल आम्ही स्वीकारला आहे. यशाने हुरळून न जाता आम्ही अपयशाने नाउमेदही होत नाही. आता विधानसभेला (Vidhan Sabha) लोकसभेसारखा दणका देऊ नका आम्ही कामाची माणसे आहोत असे सांगत आंबेगाव शिरूर मतदार संघाचा उमेदवार राज्यात एक नंबर मताधिक्क्याने निवडून आला पाहिजे असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेसची जन सन्मान यात्रा मंचर  येथे आल्यानंतर झालेल्या जाहीर सभेत उपमुख्यमंत्री पवार बोलत होते.यावेळी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, रूपाली चाकणकर, पोपटराव गावडे, सुरज चव्हाण, शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

अजित पवार म्हणाले, आंबेगाव शिरूरची जनता नशीबवान आहे. त्यांना सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासारखे संयमी व अभ्यासू नेतृत्व मिळाले आहे. कर्तुत्ववान माणसे सारखी येत नाही. वळसे पाटील यांनी आंबेगाव शिरूर मतदार संघाचा कायापालट केला आहे. आंबेगावचा विकास झाल्याचे कुणीही नाकारू शकत नाही. वळसे पाटील चांगले सहकारी व उत्कृष्ट प्रशासक आहेत. विधानसभा निवडणुकीत महायुतीमध्ये ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला येणार असून येथील जागा एक नंबर मताधिक्याने निवडून आली पाहिजे असे सांगून पवार म्हणाले. या मतदार संघाला तळहाताच्या फोडा प्रमाणे जपण्याचे काम वळसे पाटील यांनी केले असूनही काही हौसे, नवसे, गवसे येऊन वल्गना, टीका करतात. मात्र आम्ही फक्त विकास कामावर बोलू. केवळ शिव्या शाप देऊन प्रश्न सुटणार नाही अथवा कायापालट होणार नाही. 

रक्षाबंधन सनापूर्वी दीड कोटी महिलांच्या खात्यामध्ये माझी लाडकी योजनेचा हप्ता जमा होणार आहे. महायुती सरकार शब्द पाळणारे असून आम्ही ही योजना बंद करणार नाही. योजना थांबवायची ही चालवायची हे तुमच्या हातात आहे. घड्याळ, धनुष्यबाण व कमळ यांना पाठिंबा दिला तर योजना चालू राहील. दोन ते अडीच कोटी महिलांना योजनेचा लाभ मिळण्याचा अंदाज आहे. योजनेला चांगला प्रतिसाद मिळत असताना विरोधक चुनावी जुमला असल्याचा आरोप करतायेत. मात्र आम्ही माय माऊलींना फसवणार नाही तसेच फसवेगिरी करणार नाही. अनेक सभा पाहिल्या मात्र एवढ्या प्रचंड संख्येने महिला आज पाहतो आहे. आमच्यावर भावाच्या नात्याने महिलांनी विश्वास ठेवावा असेही पवार म्हणाले. 

दिलीप वळसे पाटील म्हणाले, काही लोक वळसे पाटील आगामी निवडणुकीला उभे राहणार नसून त्यांची कन्या उभी राहणार आहे अशी चर्चा करत आहे. मात्र माझी कन्या निवडणूक लढवण्यास तयार नाही. नाईलाजाने मलाच निवडणूक लढवावी लागणार. अनेक लोक बदनामी करत आहेत. खोटे, नाटे सांगून काहीतरी बोलतात त्यावर मी आज उत्तर देणार नाही. वेळ आल्यावर बोलून वस्तुस्थिती सांगणार आहे असे ते म्हणाले. म्हाडाचे अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

Web Title: Ajit Pawar Don't give the Vidhan Sabha a bang like the Lok Sabha We are people of work - Ajit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.