पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील मेट्रोच्या कामाची पाहणी केली. त्यासाठी ते सकाळी पावणे सहा वाजताच्या सुमारास पुणे स्टेशन येथील मेट्रो कामाच्या ठिकाणच्या पोहचले. त्यामुळे मेट्रो अधिकाऱ्यांची तारांबळ उडाल्याचे पाहायला मिळाले.
पुण्यामध्ये पिंपरी चिंचवड ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी या दोन मार्गांचे काम महा मेट्रोकडून सुरू आहे. यातील पुणे स्टेशन येथील सुरू असलेल्या कामाची माहिती अजित पवार यांनी घेतली. दरम्यान, अजित पवार येणार म्हटल्यावर मेट्रोचे अधिकारीदेखील झाडून उपस्थित होते.
कोरोना संकट काळात मेट्रो काम बंद होते. आता कामगार संख्या सुद्धा कमी आहे. त्यामुळे अजित पवार यांनी यावेळी मेट्रो प्रकल्पाचे काम कशा पद्धतीने सुरू आहे, स्टेशन कशी असणार, पुणे मेट्रोसाठी सर्व जागा संपादित आहे का? यांची केली पाहणी केली. तसेच, सध्या कामगारांचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे प्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण होऊ शकणार नाही, असे असताना या कामाला गती कशी देता येईल याविषयीची चर्चा अजित पवार यांनी मेट्रो अधिकाऱ्यांसोबत केल्याचे समजते.
दरम्यान, याआधीही अजित पवार यांनी भल्या पहाटे पुण्यातील मेट्रोच्या कामाची पाहणी केली होती. त्यावेळी पिंपरी-चिंचवडमध्ये सुरू असलेल्या कामाची माहिती अजित पवार यांनी घेतली होती. त्यासाठी ते सकाळी सहा वाजता फुगेवाडी स्टेशनवर पोहोचले होते.
आणखी बातम्या..
- Bharat Bandh: कृषी विधेयकांविरोधात आज 'भारत बंद'ची हाक; विरोधकांसह अनेक शेतकरी संघटनांचा सहभाग
-"माझे घर पाडण्यापेक्षा 'त्या' इमारतीकडे लक्ष दिले असते तर...", कंगनाचा पुन्हा उद्धव ठाकरेंवर निशाणा
- PM Kisan Scheme : ५.९५ लाख खात्यांची चौकशी, ५.३८ लाख लाभार्थी नकली; आता काय करणार मोदी सरकार?
- PM Kisan Scheme : शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाले ९३ हजार कोटी; अशाप्रकारे करू शकता अर्ज
- मानलं गड्या! नोकरीसाठी ६० वर्षांच्या माजी सीईओंनी मारले पुशअप्स; पाहा फोटो
- मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांसाठी खूशखबर, आता सहा नाही तर दहा हजार मिळणार सन्मान निधी