Ajit Pawar: 'अजितदादांनी शब्द पाळला', बारामतीतून महिलांनी २५ हजार राख्यांची भेट पाठवली

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2024 04:02 PM2024-08-16T16:02:53+5:302024-08-16T16:03:35+5:30

बोले तैसा चाले.., याप्रमाणे नेहमीच अजितदादांनी दिलेला शब्द पाळला, महिलांच्या भावना

ajit pawar kept his word women sent a gift of 25 thousand rakhi from Baramati | Ajit Pawar: 'अजितदादांनी शब्द पाळला', बारामतीतून महिलांनी २५ हजार राख्यांची भेट पाठवली

Ajit Pawar: 'अजितदादांनी शब्द पाळला', बारामतीतून महिलांनी २५ हजार राख्यांची भेट पाठवली

बारामती: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केल्यानंतर या योजनेसाठी महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून अजित दादांनी राखी पौर्णिमेपूर्वी (Rakshabandhan 2024) योजनेतील दोन महिन्यांचा हप्ता महिलांच्या खात्यावर जमा करण्याचे आश्वासन आज पूर्ण झाल्याने बारामती शहरातील महिलांनी समाधान व्यक्त करत अजितदादांना २५ हजार राख्यांची भेट पाठविली आहे. 

 मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची (Mukhyamantri Ladki Bahin Yojana) घोषणा अर्थमंत्री म्हणून अजित पवार यांनी अर्थसंकल्पात जाहीर केली. या योजनेसाठी संपूर्ण राज्यातून महिलांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. या योजनेचा लाभ प्रत्येक पात्र महिलांना मिळावा, यासाठी शासकीय अधिकाऱ्यांसह राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूचना दिल्या आहेत. बारामतीमध्ये या योजनेची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी स्वतः अजित पवार यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन तशा सूचना दिल्या आहेत. विशेषतः बारामतीतील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सूचना दिल्या होत्या. त्यामुळे बारामती शहरातून महिलांचा मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद या योजनेला मिळत आहे. लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांच्या खात्यावर दोन महिन्यांचे पैसे जमा झाल्याने महिलांनी आनंद व्यक्त केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील महिलांच्या खात्यावर रक्षाबंधनापूर्वी दोन महिन्यांचे या योजनेचे पैसे जमा करण्याचे आश्वासन दिले होते. उपमुख्यमंत्री अजित दादांनी या आश्वासनाची पूर्तता केल्याचे आज स्पष्ट झाले. अजितदादांनी महिलांना रक्षाबंधनाची ही भेट दिल्याने बारामती शहरातील महिलांकडून २५ हजार राख्या जमा करून त्या राख्या उपमुख्यमंत्री अजितदादा यांना पाठवण्यात येणार असल्याचे महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्ष अनिता गायकवाड व राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष जय पाटील यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या महत्त्वपूर्ण योजनेची घोषणा केल्यामुळे खऱ्या अर्थाने महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. बोले तैसा चाले.., याप्रमाणे नेहमीच अजितदादांनी दिलेला शब्द पाळला आहे. आम्हा कार्यकर्त्यांना त्यांचा त्यामुळेच अभिमान आहे. अशा या कार्यकर्तबगार नेतृत्वाला आम्हा कार्यकर्त्यांसह संपूर्ण राज्यातील महिला भगिनी नेहमीच पाठिंबा देत आहेत.  -जय पाटील, अध्यक्ष,बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेस

Web Title: ajit pawar kept his word women sent a gift of 25 thousand rakhi from Baramati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.